Isapniti 101 Chan Chan Goshti, Story Books for Kids, Isapaniti Children Book in Marathi, इसापनीती बाल कथा, छान छान गोष्टी पुस्तके, मराठी पुस्तक Esapniti Aesop
₹220.00
Description
Price: ₹220.00
(as of Feb 23,2023 03:54:39 UTC – Details)
From the Publisher
Isapniti 101 Goshti
भारतीय संस्कृतीला प्राचीन काळापासून पारंपारिक कथा आपण ऐकलेल्या आहेत. या कथांनी मानवी जीवमूल्यांची जपणूक करून मानवांवर संस्कार केले. या कथांमध्ये इसापनीती कथांचा महत्त्वाचा वाटा आहे. इसापच्या नीतिकथा रंजक आणि उद्बोधक आहेत. गेली अनेक वर्षं या कथांनी लहान-थोरांना खिळवून ठेवत कोणत्या प्रसंगी जीवनात कसे वागावे, याचे ज्ञान आणि शिकवण दिली आहे. बुद्धिमत्तेचा विकास करण्याबरोबरच सारासारविचार करून विवेकपूर्ण निर्णय घेण्यासाठीही इसापच्या नीतीकथा आबालवृद्धांना प्रेरणा देणार्या आहेत.
जंगलात एक सिंह राहत होता. जंगलाशेजारी हिरवंगार गवताचं कुरण होतं. कुरणात चार बैल चरत होते. बैल तरुण होते आणि बरी शिकार मिळाली बघून सिंह त्यांच्यावर चालून गेला. एखाद्या बैलाला झडपेत खाली पाडावं आणि जंगलात ओढून न्यावं, असा सिंहाचा बेत होता.
आनंदात चरणार्या बैलांनी जवळ येणारा सिंह बघताच शेपट्या उंचावल्या.शिगांचे भाले सरसावून ते सिंहावर धावून गेले. अंगावर आलेल्या चार बैलांना बघून सिंहानं काढता पाय घेतला.
दुसर्या दिवशी पुन्हा संधी बघून त्याने शिकारीचा प्रयत्न केला. याही वेळेस बैलांनी एकजुटीने सिंहाला पळवून लावलं. सिंह शिकार करण्यासाठी येऊ लागला की, बैल लगेच त्याच्याभोवती कडं करू लागले. सिंह कोणत्याही दिशेनं वळला तरी बैलांच्या शिंगांचे भाले त्याच्यावर धावून येऊ लागले.
बैलांच्या एकीनं सिंहाची डाळ शिजेना. तो मनातले मांडे खात वाट बघू लागला. आणि एके दिवशी बैलांत खूप भांडण झालं. एक दुसर्याशी न बोलणे. दुसर्याचं तोंडही पाहायचं नाही, असं ठरवून प्रत्येक बैल आपापला वेगळ्या मैदानात चरू लागला. सिंहाला ही नामी संधी लाभली होती आणि याची तो आतुरतेने वाटही पाहत होता.
सिंहानं एका बैलाला गाठलं. अंगावर आलेला सिंह बघून बैलानं आजूबाजूला बघितलं. त्याला आपल्या तीन मित्रांची तीक्रतेनं आठवण झाली. बैलानं एकट्यानं प्रतिकार करायचा प्रयत्न केला; पण सिंहापुढं त्याची डाळ शिजली नाही.
काही दिवसांनी दुसर्या बैलांचा नंबर लागला. असं करत चारही बैलांचा निकाल लागल्यानंतर सिंह तृप्त झाला. समाधानानं ढेकर देताना स्वत:शी म्हणाला, ‘‘ते बैल अजूनही एकोप्यानं कुरणात चरत राहिले असते; पण मूर्खांच्या एकीला दुहीचा शाप भोवला.’’
दोन माणसं जंगलातून प्रवास करत होते. दाट झाडी होती. भर उन्हात डोक्यावर सावली होती. पहिला दुसर्यास म्हणाला, ‘‘अशा उन्हाळ्यात ही झाडे नसती तर उन्हाचा त्रास झाला असता.’’ दुसरा म्हणाला, ‘‘त्यात काय विशेष आहे. ज्यांनी कोणीही लावली असतील, जणू आपल्यासाठीच ती आहेत.’’
पहिल्याला आपल्या मित्रांचं हे बोलणं मनापासून आवडलं नाही; पण ते यावर काही बोलले नाही. तसेच पुढं चालू लागले. थोडं अंतर चालून गेले असतील, तोच एकदम त्यांचा रस्ता काळ्याशार प्राण्यानं अडवला. ते होतं एक भलं मोठं अस्वल. दोन्ही पायांवर उभं राहून ते नाचू लागलं. दोन्ही अंगावर डोलू लागलं. हाताने इशारे करू लागलं. मध्येच गुरगुरत दात विचकावू लागलं.
दुसरा माणूस एकवेळ मित्राकडे आणि एक वेळ अस्वलाकडे बघू लागला. दुसर्याक्षणी चटकन शेजारच्या झाडावर चढला आणि फांद्याच्या आड लपला. पहिल्या माणसानं आजूबाजूला पाहिलं, झाडावर चढायला त्याला सवड नव्हती. अस्वल तर दोन हात अंतरावर आलेलं. प्रसंगावधान राखून तो झटकन जमिनीवर आडवा झाला. मेला असल्याचं त्यानं नाटक केलं. त्यानं ऐकलं होतं, मेलेल्या माणसाला अस्वल स्पर्शही करत नाही.
अस्वल झोपलेल्या माणसाजवळ आलं. त्याचं डोकं-शरीर हुंगलं. मान हलवली आणि घनदाट जंगलात निघून गेलं. जेव्हा अस्वल दृष्टीआड झालं तेव्हा झाडावरचा मित्र हळुवार खाली उतरला. उत्सुकतेनं आडवं झालेल्या मित्राला म्हणाला, ‘‘अस्वल तुझ्या कानाजवळ कुजबुजताना मी बघितलं. काय सांगत होतं अस्वल?’’
पहिला माणूस उठून बसला आणि शांतपणे म्हणाला, ‘‘जो मित्र आपल्या सवंगड्याला संकटात सोडून एकटाच पसार होतो, अशा मित्रा सोबत पुन्हा कधी प्रवास करू नकोस, असं सांगितलं अस्वलानं.’’ आपल्या मित्राच्या डोळ्यात नजर रोखत तो म्हणाला, ‘‘अस्वल शेवटी म्हणालं, संकटातच खर्या मित्राची ओळख होते.’’
Publisher : Saket Prakashan Pvt Ltd (1 January 2022)
Language : Marathi
Paperback : 248 pages
ISBN-10 : 9352203593
ISBN-13 : 978-9352203598
Reading age : 3 – 15 years
Item Weight : 320 g
Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin : India
Reviews
There are no reviews yet.