Krishnaniti – Krishna Niti Book in Marathi, मराठी पुस्तक, Bhagvan Shree Krishna Books, Bhagavad Gita, कृष्ण भगवान, भागवत गीता पुस्तके
₹247.00
Description
Price: ₹247.00
(as of Feb 23,2023 17:51:50 UTC – Details)
From the Publisher
Krishnaniti
जीवनात परिवर्तन हवे असेल, तर आपल्या प्रत्येकामध्ये असणारा ‘कृष्ण’ आपल्याला जागवावा लागेल. धर्माचा, नीतिनियमांचा आणि सामाजिक विचारांचा सूक्ष्मार्थ लावीत कृष्णाने जटिल समस्या सोडविल्या होत्या. बलाढ्य कौरवांना अद्दल घडवून त्याने एका मोठ्या बदलाचा प्रारंभ केला. सुरुवातीस श्रीकृष्णाकडे ना सैन्य होतं ना कोणती सामग्री; पण तरीही कृष्ण कुठेच थांबला नाही. साहस, प्रचंड श्रम आणि उत्तम नेतृत्वगुणांसह कृष्ण पुढेच जात राहिला. श्रीकृष्णाचं हे कर्तृत्व व ते मिळविण्याची नीती म्हणजेच कृष्णनीती. कृष्ण कोण होता? कृष्णाचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, कृष्णाचे परिपूर्ण नेतृत्व, राजनीतिज्ञ कृष्ण, तत्त्वज्ञ कृष्ण, प्रेमाचा सिद्धांत, श्रीकृष्णाचे संपत्तीनिर्मितीबद्दलचे धोरण, पृथ्वीचे भविष्य अशा वैशिष्ट्यपूर्ण प्रकरणांद्वारे डॉ. जाखोटिया श्रीकृष्ण जीवनदर्शन घडवितात. डॉ. गिरीश प. जाखोटिया यांना मराठी भाषेतून ललित लेखन करून राष्ट्रीय चेतना जागविल्याबद्दल पुणे मराठी ग्रंथालयातर्फे ‘कृष्णनीती’ या पुस्तकासाठी चेतना पुरस्कार मिळाला आहे.
या पुस्तकात कृष्णाचे उलगडलेले नेतृत्वगुण, व्यक्तिमत्त्व, त्याचे डावपेच, त्याची रणनीती, त्याचा प्रेमाचा सिद्धांत आपण सर्वांनीच आज आचरणात आणला तर आपली आणि आपल्या या भारत देशाची निश्चितच प्रगती होईल.
अर्थात २१ व्या शतकातही आपला ‘प्रिय कृष्ण’ आचरणीय आहे, गरज आहे ती फक्त त्याच्या नीतीकडे डोळसपणे पाहण्याची!
डॉ. गिरीश प. जाखोटिया
• ‘जाखोटिया अॅण्ड असोसिएट्स’, विलेपार्ले (पू.), मुंबई या व्यवस्थापकीय सल्लागार संस्थेचे संचालक. • ख्यातनाम व्यवस्थापकीय, वित्तीय व उद्योजकीय सल्लागार. • तब्बल ६० भारतीय व विदेशी कंपन्या आणि बँकांचे सल्लागार. • जमनालाल बजाज व्यवस्थापन शिक्षण संस्था, मुंबई विद्यापीठात १५ वर्षे प्राध्यापक म्हणून अनुभव. • भारतात व भारताबाहेर विविध विषयांवर २००० पेक्षा अधिक व्याख्याने. • पत्नीसह उद्योगजगतातील व्यवस्थापकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन. • सहा इंग्रजी व सहा मराठी पुस्तकांचे लेखक. • अनेक उद्योजकीय व वित्तीय संस्थांसाठी काम करताना नव्या कल्पना व रचनांचा वापर. • भारतीय व्यवस्थापनअर्थकारणाचा विस्तृत आढावा घेताना गेली ३० वर्षे ‘आध्यात्मिक अर्थशास्त्रा’चाही अभ्यास सुरू. सन्मान व पुरस्कार • सन १९९५ : ‘बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशन’तर्फे अखिल भारतीय व्यवस्थापन शिक्षणातील सर्वोत्तम प्राध्यापक सन्मान प्राप्त. • सन १९९६ : ‘अखिल भारतीय व्यवस्थापन – शिक्षणातील सर्वोत्तम प्राध्यापक’ हा सन्मान प्राप्त.
Publisher : Saket Prakashan Pvt. Ltd.; Tenth edition (1 January 2019); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language : Marathi
Paperback : 288 pages
ISBN-10 : 8177869485
ISBN-13 : 978-8177869484
Item Weight : 300 g
Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin : India
Net Quantity : 1 Count
Packer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name : Book
Reviews
There are no reviews yet.