As A Man Thinketh: Vicharanchi Shakti Olkha – Inspirational Motivational Success Book in Marathi Books प्रेरणादायी मराठी पुस्तक पुस्तकं पुस्तकें पुस्तके बुक बुक्स Sucessful Motivation Inspiration Self Help Pustak, Think it, Thinketg, Thinking, James Allen, Full Version, Alen, Jems Alan, The Positive Power, Believe in Yourself

Description

 

As A Man Thinketh : Vicharanchi Shakti Olkha by James Allen

as a man thinketh in marathias a man thinketh in marathi

तुम्हाला त्या सर्वोच्च स्वर्गावर आरूढ व्हायचे आहे का,

तुम्हाला त्या नीचतम पातळीला जायचे आहे का,

तर तुम्ही त्या शाश्वत सौंदर्याची स्वप्ने पाहा

किंवा मग त्या नीचतम विचारांमध्ये लोळत राहा.

कारण उंचावरील स्वर्ग म्हणजेच तुमचे विचार

आणि नीच नरक म्हणजे तुमचे विचारच

विचारांशिवाय परमशांती कुठेच नसते

वेदना फक्त विचारांनाच माहीत असतात.

विचारांशिवाय ही विश्वेही नष्ट होतील.

मान-सन्मानाचे अस्तित्व केवळ स्वप्नांमध्येच असते

आणि युगानुयुगे चाललेल्या त्या नाटकाचा

उगम त्या चिरंतन विचारापासून होतो.

प्रतिष्ठा आणि लज्जा व दु:ख,

वेदना व यातना, प्रेम व तिरस्कार म्हणजे

खरे तर नियतीवर अधिराज्य गाजविणार्‍या

त्या चैतन्यमयी विचारांवर चढवलेला

मुखवटा असतात. इंद्रधनुष्याचे

निरनिराळे रंग मिळून

प्रकाश एक प्रकाशकिरण बनतो,

तसेच जगभरात घडणारे बदल

मिळून एक चिरंतन स्वप्न बनते.

आणि ते स्वप्न पूर्णपणे तुमच्या अंतर्मनात आहे

आणि ते स्वप्न पाहणारा त्या पहाटेची वाट पाहत आहे

ज्या पहाटेने त्याच्यात चैतन्यमयी व कणखर

विचारांची जाग येईल

अशाने ते आदर्श स्वप्न खरे होईल

पाताळाच्या स्वप्नांचा नाश अशा स्वर्गात होईल

सर्वोच्च, सर्वाधिक पवित्र अशा स्वर्गामध्ये

केवळ शुद्ध आणि परिपूर्ण गोष्टीच वास्तव्य करतात.

दुर्दैव हे विचारांच्या मंथनातून आले आहे

चांगुलपणाचेही तसेच आहे

प्रकाश आणि अंधकार, पाप आणि पुण्य

हे त्याचप्रमाणे विचारांच्या माध्यमातून जन्मले आहेत.

भव्य गोष्टींच्या विचारात मग्न राहा

आणि तुमच्या नजरेला केवळ भव्य तेच पडेल

आणि तुमचे मन सर्वोच्च गोष्टींवर केंद्रित करा

मग तुम्हीसुद्धा सर्वोच्च पदावर पोहोचाल.

या पुस्तकातील काही प्रेरणादायी विचार : माणूस केवळ त्याच्या विचारांना उन्नत करून उभारी घेऊ शकतो, जिंकू शकतो आणि सिद्धी मिळवू शकतो.

माणूस स्वत:मुळेच घडतो किंवा बिघडतो. विचारांची योग्य निवड व खरा वापर करून तो दैवत्वाची उंची मिळवू शकतो; तर विचारांच्या चुकीच्या वापराने, दुर्विचाराने त्याची अधोगती पशूपेक्षा खालच्या पातळीपर्यंत होऊ शकते. दैवत्व आणि पशू या दोन अतिम ‘ध्रुवांच्या दरम्यान चारित्र्याच्या विविध छटा असतात आणि मानव त्यांचा निर्माता व धनी असतो.

चांगले विचार, चांगल्या कृती कधीच वाईट परिणाम आणू शकत नाहीत; वाईट विचार व कृती कधीच चांगले परिणाम आणू शकत नाहीत.

ज्याने शंका व भीतीवर विजय मिळवला त्याने अपयशावर विजय मिळवला असे समजा. त्याचा प्रत्येक विचार शक्तीने। भारावलेला असतो, सगळ्या अडचणींना हिमतीने तोंड दिलेले असते व शहाणपणाने त्यांच्यावर मात केलेली असते. योग्य ऋतूमध्ये त्याच्या हेतूची पेरणी झालेली असते. त्यामुळे ते बहराला येतात. त्यांना अशी फळे लगडतात जी कधीच जमिनीवर पडत नाहीत. ‘शरीर मनाचा गुलाम असतो… आनंदी आणि सौंदर्यपूर्ण विचारांच्या आदेशाने त्याला तारुण्याची आणि सौंदर्याची झळाळी येते.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; Third edition (1 January 2016); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 128 pages
ISBN-10 ‏ : ‎ 8177865706
ISBN-13 ‏ : ‎ 978-8177865707
Item Weight ‏ : ‎ 100 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Importer ‏ : ‎ Saket
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “As A Man Thinketh: Vicharanchi Shakti Olkha – Inspirational Motivational Success Book in Marathi Books प्रेरणादायी मराठी पुस्तक पुस्तकं पुस्तकें पुस्तके बुक बुक्स Sucessful Motivation Inspiration Self Help Pustak, Think it, Thinketg, Thinking, James Allen, Full Version, Alen, Jems Alan, The Positive Power, Believe in Yourself”

Your email address will not be published. Required fields are marked *