You Can Heal Your Life Books in Marathi, Louise L. Hay, book Author मराठी पुस्तक पुस्तके पुस्तकं बुक बुक्स, Self Help, L Motivational Bestseller, लुईस एल हे Best seller, luis Hey हील युअर बॉडी, हिल

150.00

Category:

Description

Price: ₹150.00
(as of Feb 23,2023 04:16:17 UTC – Details)



From the Publisher

You Can Heal Your Life by Louise L. Hay

You Can Heal Your Life - MarathiYou Can Heal Your Life - Marathi

तुमचे जगणे तुमच्या हाती ! यश, संपत्ती आणि आरोग्य मिळवून देणारे

‘यू कॅन हील युवर लाईफ’ हे पुस्तक म्हणजे निरामय जीवन जगण्यासंबंधीचे सुस्पष्ट आणि सविस्तर विवेचन आहे. या पुस्तकामुळे लाखो लोकांच्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन घडले आहे. या पुस्तकाच्या वाचनानंतर आरोग्य आणि सुस्थितीतील जीवनाबद्दल परिणामकारक प्रभाव पडतो, अशा आशयाची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. जगविख्यात अध्यापक लुईस एल. हे यांनी मन आणि शरीर यांच्यातील अंतरंगाचे यथार्थ दर्शन या पुस्तकाद्वारे घडविले आहे. मर्यादित विचार आणि त्रोटक कल्पनांमुळे आपल्यावर विशिष्ट प्रकारचे बंधन येते. त्या स्थितीचा अभ्यास करून लुईस हे यांनी आपल्याला शारीरिक व्याधी आणि अस्वस्थतेची कारणे समजावन घेण्याची गरूकिल्ली दिली आहे. जगभरातील लाखो लोकांना अनेकविध कल्पना सुचवणारी आणि स्वतःला स्वतःचीच मदत मिळवून घेण्यासाठी उपयुक्त ठरणारी मार्गदर्शिका असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. विचारांना नवी दिशा देणारे हे आरोग्यविषयक प्रेरणादायी विवेचन आहे. लुईस हे या अधिव्याख्याता आणि अध्यापक आहेत. २७ पुस्तकांच्या त्या लेखिका आहेत. ‘हील युवर बॉडी’ आणि ‘दी पॉवर इज विदीन यू’ ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. जगातील निरनिराळ्या २६ भाषांमध्ये त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झाले असून, ३५ देशांमध्ये ती पुस्तके उपलब्ध आहेत.

”तुम्हाला स्वत:चे मोल जाणून घेण्यासाठी, तसेच आत्मसन्मान आणि प्रेम मिळविण्यासाठी हे पुस्तक तुम्ही कुठेही असलात तरी तुमच्या आत शोधून काढण्यासाठी उपयुक्त ठरेल.”

-लुईस एल. हे

”समजा मला एखाद्या निर्जन बेटावर सोडून देण्यात आलं आणि सोबत फक्त एकच पुस्तक ठेवण्याची संधी दिली, तर मी खात्रीने लुईस एल. हे यांच्या ‘यू कॅन हिल युवर लाईफ’ या पुस्तकाची निवड करील.

हे काही फक्त थोर शिकवण देणारे पुस्तक आहे म्हणून नाही, तर त्यात अतिशय ताकदीची आणि उपयुक्त अशी एका महिलेच्या अनुभवातून आलेली वक्तव्ये आहेत.

आपल्या जीवन प्रवासातील काही अनुभव लुईस हिने आपल्या या नव्या पुस्तकात प्रभावीपणे मांडली आहेत. तिने मांडलेले हे जीवनानुभव अतिशय उपयुक्त आणि थोडक्यात खूप काही सांगणारे आहेत.

मला जे अपेक्षित आहे ते सर्व या पुस्तकात आहे. जीवनाबद्दल अधिकाधिक जाणून घेणे, ही आपली प्रत्येकाची गरज आहे. तो एक पाठ असतो आणि इथे आपण चांगल्या प्रकारे जगण्यासाठी योग्य काय करायचे, ते सांगितले आहे. योग्य मानसिक आणि शारीरिक स्थिती निर्माण करण्यासाठी कशा प्रकारे जगायचे ते लुईसने या पुस्तकात सांगितले असून अशा प्रकारची सोप्या भाषेतील माहिती देणारे माझ्या माहितीतले तरी हे एकमेव पुस्तक आहे. एखाद्या निर्जन बेटावर असलेल्या व्यक्तीच्या हाती हे पुस्तक लागले, तर अशा ठिकाणी आणि अशा परिस्थितीत योग्य कसे जगायचे ते त्याला आपोआप कळेल. इतकेच नाही, तर तो अतिशय चांगल्या प्रकारचे जीवन जगेल.”

-डेव्हिड ब्रून

व्हेंचर्स इन सेल्फ फूलफीलमेंट,

डेना पॉइंट, कॅलिफोर्निया.

 Louise L. Hay Louise L. Hay

लुईस एल. हे

‘यू कॅन हील युवर लाईफ’ या आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर पुस्तकाच्या लेखिका आणि 50 दशलक्ष पुस्तकप्रतींच्या माध्यमातून लोकांना प्रोत्साहन देणाऱ्या मार्गदर्शिका. स्वत:ला स्वत:चीच मदत मिळवून घेण्यासाठी आणि आपले सुप्त गुण ओळखण्यासाठी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले आहे.

निश्चयाच्या सामर्थ्यामुळे सकारात्मक बदल कसे होतात याविषयावर त्यांनी जगभरातल्या लोकांना मार्गदर्शन केलं. प्रौढांसाठी आणि मुलांसाठी मिळून लुईस हे यांची 30 पुस्तके आतापर्यंत प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या ‘पॉवर इज विदीन यू’ आणि ‘हील युवर बॉडी’ या पुस्तकांचा बेस्टसेलरमध्ये समावेश आहे.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; Nineth edition (1 January 2016); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 232 pages
ISBN-10 ‏ : ‎ 8177865269
ISBN-13 ‏ : ‎ 978-8177865264
Item Weight ‏ : ‎ 210 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Importer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India Phone : 9881745605
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “You Can Heal Your Life Books in Marathi, Louise L. Hay, book Author मराठी पुस्तक पुस्तके पुस्तकं बुक बुक्स, Self Help, L Motivational Bestseller, लुईस एल हे Best seller, luis Hey हील युअर बॉडी, हिल”

Your email address will not be published. Required fields are marked *