Price Action Trading & Intraday Trading : Share Market Books in Marathi Indian Stock Option Technical Analysis & Investing, Learning Guide Zone Bazar Book : द शेअर मार्केट, Sharemarket on Intraday with trends charts इंट्राडे ट्रेडिंग, मराठी पुस्तक, प्राइस एक्शन बुक, बाजार इन झोन Bazaar, Bajar

390.00

Category:

Description

Price: ₹390.00
(as of Feb 28,2023 18:16:38 UTC – Details)



From the Publisher

The Subtle Art of Intraday Trading

Intraday TradingIntraday Trading

बहुतेक लोकांसाठी इंट्राडे ट्रेडिंग ही एक अनोखी आणि रहस्यमय कार्यपद्धती आहे. यू ट्यूबवर चालणारे आणि ताबडतोब नफा कसा मिळवावा हे सांगणारे इंट्राडे ट्रेडिंग या विषयावरील व्हिडिओज फारच लोकप्रिय आहेत. कोणत्याही व्यक्तीला ‘इंट्राडे ट्रेडिंग’ हा शब्द ऐकताच त्याच्या मनात उभा राहणारा पहिला शब्द कोणता असे विचारले तर, बहुतेकजण एकतर‘पैसे’ किंवा ‘भीती’ हा शब्द सांगतील.

खरोखरच जर इंट्राडे ट्रेडिंगमध्ये पैसे कमवणे इतके सोपे असते तर प्रत्येकाने त्यातून पैसे कमवले असते. इथे यशस्वी व्हायचे असेल तर सुयोग्य कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. कारण, इंट्राडे ट्रेडिंगमध्ये योग्य स्टॉक्सची निवड करणे महत्त्वाचे असते. एखादी लहानशी चूक अवघ्या काही तासांतच मोठे नुकसान घडवून आणू शकते. त्याउलट योग्य स्टॉक्सची निवड केली तर सरासरी आरओआयपेक्षा अधिक कमाई करता येते हे खरे आहे. त्याकरिता इंट्राडे ट्रेडिंगच्या

रणनीती समजून घेऊन केलेले व्यवहार अधिक फायदेशीर ठरतात.

तेव्हा, इंट्राडे ट्रेडिंगबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा आणि भारतीय स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी व्हा!

Intraday TradingIntraday Trading

तुम्हाला माहिती नसल्यास ट्रेडिंगच्या वातावरणात कोणतीही ट्रेडिंग सिस्टम चांगलेच परिणाम देते; परंतु तीच सिस्टम एकच बाजू दर्शविणार्‍या वातावरणात किंवा आस्थर शेअर बाजारात दयनीय परिणाम दर्शवते.

शेअर बाजार आस्थर असतो तेव्हा एक सरासरी रिव्हर्जन ट्रेडिंग सिस्टम (कमी खरेदी करा आणि उच्च विक्री करा) एकाच बाजूच्या ट्रेंडमध्ये चांगले कार्य करते; परंतु अस्थिर वातावरणात ती पूर्णत: अपयशी ठरते.

म्हणून एखाद्या व्यक्तीने त्याच्या ट्रेडिंगच्या व्यवहारामध्ये एखादी सोपी ट्रेडिंग सिस्टम वापरून शेअर बाजाराच्या या वेगवेगळ्या टप्प्यांचा अनुभव घेतला पाहिजे. त्यामुळे त्याची ट्रेडिंग सिस्टम केव्हा कार्यक्षम असते आणि केव्हा अयशस्वी होऊ शकते हा फरक त्याला समजू शकेल, तसेच शेअर बाजाराच्या अनुकूल परिस्थितीमध्ये तो पिरॅमिड स्थितीचा देखील (पिरॅमिडिंग पोझिशन्सचा) विचार करू शकतो आणि इतर परिस्थितीत त्याने ट्रेडिंग टाळण्यासाठी किंवा प्रत्येक व्यवहारामागे कमी जोखीम घेण्याचे नियम विकसित केले पाहिजेत.

हे पुस्तक म्हणजे, डे ट्रेडिंगमधील माझ्या व्यावहारिक अनुभवासह सर्व मौल्यवान माहिती एकत्र करण्याचा छोटासा प्रयत्न आहे.

इंट्राडे ट्रेडिंगमध्ये सातत्यपूर्ण नफा मिळवण्याचे उद्दिष्ट असलेले नवोदित, मध्यवर्ती स्तरावरील ट्रेडर्स आणि तज्ज्ञांना हे पुस्तक मदत करेल.

इंट्राडे ट्रेडिंग हे केवळ टी-20 क्रिकेट गेमसारखे का आहे? टी-20 क्रिकेट हा सर्वांत आक्रमक आणि स्पर्धात्मक खेळ आहे. प्रत्येक क्रिकेटपटू त्याच्या प्रत्येक खेळासाठी अतुलनीय तयारी करतो आणि कोणत्याही त्रुटींशिवाय तो अमलात आणण्याचा प्रयत्न करतो.

इंट्राडे टे्रडिंग देखील कोणत्याही टी-20 खेळाप्रमाणेच स्पर्धात्मक आणि आक्रमक असू शकते. दोन्ही खेळांमध्ये दावे जास्त आहेत आणि तुम्ही तुमच्या मोबाइल किंवा टीव्ही स्क्रीनवर पाहता त्यापेक्षा कितीतरी अधिक दावे काही खेळ जिंकण्यासाठी खेळावे लागतात.

ट्रेडर्सनी खेळ सुरू होण्यापूर्वी त्यांची इंट्राडे स्ट्रॅटेजी आखली पाहिजे. लाइव्ह शेअर मार्केटमध्ये डे ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आखण्याचा निर्णय जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तुम्ही स्वत:च मोठ्या अपयशाचे कारण बनत असता.

क्रिकेट प्रशिक्षक आणि कर्णधार एकमेकांशी चर्चा करून क्रिकेट खेळण्याची एक रणनीती तयार करतात. नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करायची की गोलंदाजी करायची? पहिल्या सामन्यात आपण आपले लक्ष्य आक्रमकपणे धावा करण्याचे ठेवले आहे की शक्य तितक्या विकेट्स राखून ठेवून शेवटच्या काही ओव्हर्समध्ये आपण अधिक धावा काढणार आहोत?

इंट्राडे टे्रडर्सनी त्यांची योजना समान स्ट्रॅटेजीनेच बनवावी. टे्रडिंग करण्याच्या दिवशी मी किती टे्रड्स घेत आहे? एका टे्रडमागे किती टक्के जोखीम आहे? कोणत्याही टे्रडिंग दिवशी जास्तीत जास्त किती टक्के जोखीम घ्यावी? हे नियम कधी मोडायचे असतात? वगैरे.

संख्या किंवा नंबर्स हे डे टे्रडर्ससाठी नेहमीच लक्षणीय असतात. एका डे टे्रडरला हे माहीत असते की, त्याच्या ऑप्शन्स खरेदी टे्रडिंग सिस्टमच्या यशाचे प्रमाण केवळ 30 टक्के आहे. म्हणजेच त्याचे अयशस्वी होण्याचे प्रमाण 70 टक्के आहे आणि त्याला सलग अनेक अयशस्वी ट्रेड्स मिळण्याची दाट शक्यता आहे.

समजा त्याच्या टे्रडिंग भांडवलापैकी फक्त 30 टक्क्यांपर्यंतच भांडवल गमावणे त्याला भावनिकदृष्ट्या परवडते आहे. मागील चाचणी अहवालात असे म्हटले आहे की, भूतकाळात त्याच्या ऑप्शन्स खरेदी सिस्टममध्ये सलग10 अयशस्वी व्यवहार झाले. मग त्याने प्रत्येक टे्रडवर3 टक्क्यांपेक्षा जास्त जोखीम घेऊ नये.

प्राइस ॲक्शन ट्रेडिंग

Share Market BookShare Market Book

तुम्ही ट्रेडिंगव्हयुमध्ये कधी कॅन्डलस्टिक चार्ट घेऊन :

मूव्हिंग अॅव्हरेज (MA), बोलिंजर बॅन्ड (BB) आणि PSAR हे सगळे इंडिकेटर्स काढून टाकले आहेत का ?

RSI स्टॉकॅस्टिक्स, MACD, ADX हे सगळे सुप्त इंडिकेटर्स काढून टाकले आहेत का ?

विचार करा की, तुम्हाला अशा पद्धतीनं ट्रेड करता येईल का ?

हे अशक्य आहे असं तुम्हाला वाटेल; पण एक विसरू नका की, जवळपास सगळ्या इंडिकेटर्सचं अस्तित्व एकाच घटकावर अवलंबून असतं- ‘प्राइस.’ प्राइसमध्ये चढ-उतार झाला, तर या इंडिकेटर्समध्येही चढ-उतार होईल, बरोबर ? मग कशाचा अभ्यास करणं इष्ट होईल ? प्राइसचा का इंडिकेटर्सचा ? तुम्हीच विचार करू शकता.

प्राइस ॲक्शन ट्रेडिंग म्हणजे काय ?

प्राइस ॲक्शन ट्रेडिंगचं एक तंत्र आहे. यामध्ये टेक्निकल इंडिकेटर्स किंवा इतर घटकांकडे लक्ष न देता, ट्रेडर शेअर बाजाराचा अंदाज घेतो आणि प्राइस, म्हणजेच किंमतीच्या चढ-उतारांच्या आधारावर त्याचे वैयक्तिक ट्रेडिंगविषयक निर्णय घेतो.

Share Market BookShare Market Book

‘प्राइस अ‍ॅक्शन’ म्हणजे एका शेअर बाजारात स्टॉक किंवा इंडेक्स यांच्या किमतीमध्ये होणारे चढ-उतार. कोणत्याही शेअर बाजाराच्या दिवशी, शेअर बाजार सुरू झाल्यापासून बंद होईपर्यंत किंमत बदलत राहते. हा बदल म्हणजे प्राइस अ‍ॅक्शन.

प्राइस अ‍ॅक्शन ट्रेडिंग म्हणजे काय?

प्राइस अ‍ॅक्शन ट्रेडिंग ही एक अशी संकल्पना आहे, ज्यात ट्रेडर चार्ट वाचतो, आणि टेक्निकल सूचनाफलक किंवा अन्य कोणत्याही घटकांवर अवलंबून न राहता, किमतीमध्ये होणार्‍या बदलांवर आधारित ट्रेडिंगविषयी काही निर्णय घेतो.

साध्या शब्दांत, ट्रेडिंगविषयी निर्णय घेताना ट्रेडर फक्त ‘प्राइस’ आणि ‘व्हॉल्युम’ यांचाच विचार करतो.

ट्रेडिंगचे तीन मुख्य घटक (याच क्रमानुसार) असे आहेत :

1. किंमत – त्यातूनच उपलब्ध संधी समजतात.

2. वेळ – त्यातून उपलब्ध संधींचं नियमन होतं.

3. व्हॉल्युम – ज्या संधी उपलब्ध होत्या, त्यापैकी किती यशस्वी झाल्या आणि किती अयशस्वी हे मोजण्याचं मापक.

व्हॉल्युम हा आवश्यक घटक आहे, कारण बाजारातल्या 20 टक्के मोठ्या सौदेबाजांकडूनच जवळपास 80 टक्के ट्रेडिंग व्हॉल्युम निर्माण होतो.

त्यामुळे, पोझिशनल ट्रेडिंग, BTST ट्रेडिंग आणि दीर्घकालीन ट्रेडिंग यात यशस्वी सौदे करण्यासाठी तुमच्याकडे ‘प्राइस’ आणि‘व्हॉल्युम’ची माहिती असली तरी ती पुरेशी असते.

एखाद्याला स्काल्पिंग किंवा इन्ट्राडे ट्रेडिंग करायचं असेल, तर त्याला ‘वेळ’ या घटकाशी मैत्री करावी लागेल. प्रकरण पाचमध्ये मी त्याविषयी तपशिलात लिहिलेलं आहे.

Share Market BookShare Market Book

स्विंग ट्रेडिंग (Swing Trading)

जेव्हा किंमत एकदा वर, एकदा खाली अशा पद्धतीनं झोके घेत असते, म्हणजेच ‘स्विंग’ होत असते तेव्हा तिला‘साइडवेज झोन’ (Sideways Zone) असं म्हणतात. जेव्हा किंमत अशी साईडवेज जाते तेव्हा त्या झोक्याचा संपूर्ण फायदा घेण्याचं तंत्र म्हणजे स्विंग ट्रेडिंग. विरुद्ध बाजूनं दबाव वाढायच्या आधीच सौद्यातून बाहेर पडणं ही त्या मागची मुख्य कल्पना आहे. म्हणजेच, शेअर बाजार विरुद्ध दिशेनं जाण्याआधीच तुम्ही फायदा करून घेता. पहिली पायरी म्हणजे एखादा स्टॉक अथवा इंडेक्स निवडा.

दीर्घकालीन सौद्यासाठी (long trade) बुलिश एन्गल्फिंग, बुलिश हारामी, हॅमर, मॉर्निंग स्टार असे कॅण्डलस्टिक पॅटर्न्स दिसतात का त्याचा शोध घ्या. किमतीची खात्री पटली आणि ती पक्की झाली की, तक्त्यामध्ये जी सर्वाधिक किंमत दिसत आहे त्याच्याही वरच्या किमतीचा सौदा घ्या आणि तक्त्यामध्ये जी सर्वांत कमी किंमत दिसत आहे, त्याच्या खालच्या किमतीवर तुमचा स्टॉप-लॉस लावा.

पुढची रेझिस्टन्स लाइन दिसायला लागली की, सौदा पूर्ण करा. जोखीम : फायदा हे प्रमाण 1:2 असेल तरच असा सौदा करा. ट्रेंड फॉलोइंग या पद्धतीत‘ट्रेंड’ला महत्त्व असतं, कारण ट्रेंड ज्या दिशेनं असतो त्याच दिशेनं सगळे सौदे होतात.

दीर्घकालीन, म्हणजे लाँग ट्रेडकरिता आधीचा किंवा चालू ट्रेंड हा वरच्या दिशेनं असायला हवा. किंमत जर खाली आली (correction) आणि चांगला कॅण्डलस्टिक पॅटर्न दिसला, तर लाँग ट्रेडचं नियोजन करू शकता.

अल्पकालीन, म्हणजे शॉर्ट ट्रेडकरिता आधीचा किंवा चालू ट्रेंड हा खालच्या दिशेनं असायला हवा. किंमत जर वर चढायला लागली (bounce) आणि चांगला कॅण्डलस्टिक पॅटर्न दिसला, तर शॉर्ट ट्रेडचं नियोजन करू शकता.

ब्रेकआउट ट्रेडिंग

जेव्हा एखाद्या स्टॉकची किंमत एका ठराविक रेझिस्टन्स लाइनच्या बाहेर जाते आणि त्याचे जास्त प्रमाणात सौदेही होतात, तेव्हा ब्रेकआउट ट्रेडसाठी संधी असते. किमतीनं रेझिस्टन्सची पातळी मोडली की ब्रेकआउट ट्रेडर लाँग पोझिशन घेतो; त्याचा स्टॉप लॉस रेझिस्टन्स पातळीच्या खाली असतो. या पद्धतीत ट्रेडर त्याच्या स्टॉप लॉसवर लक्ष ठेवून असतो किंवा किमतीच्या चढलेल्या पातळीवर बाहेर पडून स्वत:चा मोठा फायदा करून घेता.

ASIN ‏ : ‎ B0BRJKZC3H
Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt Ltd (1 January 2023)
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 320 pages
Reading age ‏ : ‎ 15 years and up
Item Weight ‏ : ‎ 220 g
Dimensions ‏ : ‎ 20 x 15 x 15 cm
Country of Origin ‏ : ‎ India

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Price Action Trading & Intraday Trading : Share Market Books in Marathi Indian Stock Option Technical Analysis & Investing, Learning Guide Zone Bazar Book : द शेअर मार्केट, Sharemarket on Intraday with trends charts इंट्राडे ट्रेडिंग, मराठी पुस्तक, प्राइस एक्शन बुक, बाजार इन झोन Bazaar, Bajar”

Your email address will not be published. Required fields are marked *