Majhi Atmakatha माझी आत्मकथा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, Mazi Atmakatha, Inspirational Autobiography of Dr. Babasaheb Ambedkar, Motivational Biography Book in Marathi on Books, dr, डा बाबा साहेब, डॉ भीमराव अम्बेडकर, अंबेडकर पुस्तक मराठी

120.00

Category:

Description

Price: ₹120.00
(as of Feb 23,2023 13:33:23 UTC – Details)



From the Publisher

Majhi Atmakatha माझी आत्मकथा

dd

“मी वर्गीकृत लोकांत जन्मलो. त्या लोकांची प्रगती घडवून आणण्यासाठी आपले आयुष्य खर्च करावयाचे, याबद्दलची प्रतिज्ञा मी लहानपणीच केलेली आहे. या प्रतिज्ञेपासून च्युत करणारी अनेक आमिषे मला माझ्या आयुष्यात आली व गेली.फक्त स्वतःचेच चांगले करण्याचे मी लहानपणात ठरविले असते तर मला हव्या त्या प्रतिष्ठित पदावर विराजमान होता आले असते आणि काँग्रेसमध्ये मी शिरलो असतो तर तिच्यातील अत्यंत श्रेष्ठ पदाचा मी उपभोग केला असता. परंतु वर्गीकृत लोकांच्या उन्नतिप्रीत्यर्थ माझे सर्व आयुष्य वाहण्याचे ठरविले आहे आणि हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून मी एका तत्त्वाचा अवलंब करीत आलो आहे. ते तत्त्व हे की, जे कार्य सफल करण्याचा एखाद्याला भरपूर उत्साह वाटतो व ते कार्य पार पाडणे हेच ज्याच्या मनाला एकसारखे लागून राहिलेले आहे, त्याने ते कार्य पार पाडण्यासाठी आकुंचित विचारसरणीचा व कृतीचा अवलंब केला तर ते श्लाघ्य होईल. वर्गीकृत लोकांच्या हिताहिताचा प्रश्न सरकारने फार दिवस त्रिशंकूप्रमाणे लोंबकळत ठेवलेला आहे. हे पाहन माझ्या मनाला किती वेदना झाल्या असतील याची तुम्हाला (वरील हकिकतीवरून) कल्पना येईल.’

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, बॅरिस्टर, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते.

आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात विद्यावाचस्पती पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवरील संशोधन केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चामध्ये सामील झाले, समाजप्रबोधनात्मक वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. इ.स. २०१२ मध्ये, द ग्रेटेस्ट इंडियन नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची ‘सर्वश्रेष्ठ भारतीय’ म्हणून निवड करण्यात आली आहे.

प्रस्तुत ग्रंथ विद्यार्थी, ज्ञानसाधक, अभ्यासक आदींना प्रेरक ठरेल, असा विश्वास वाटतो.

dd

अखेरचे राजकीय भाषण

नागपूरच्या श्याम हॉटेलमध्ये त्यांनी आपल्या पक्षातील लोकांची सभा घेतली.

त्यावेळी ते म्हणाले, मला माहीत आहे की, तुम्हास धर्मापेक्षा राजकारणात अधिक उत्साह वाटतो. परंतु मला राजकारणापेक्षा धर्मात विशेष रस वाटतो. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने दलित वर्गात स्वाभिमान व आत्मप्रतिष्ठा निर्माण केली आहे. परंतु वर्गीयांनी आपल्यामध्ये आणि इतर समाजामध्ये एक मोठी भिंत उभी केली आहे. परिस्थिती अशा थराला आली आहे की, अस्पृश्य वर्गातील उमेदवारांना इतर लोक मते देत नाहीत. तेव्हा त्यांनी ज्या लोकांना दलितांच्या गार्हाण्याविषयी सहानुभूती आहे, त्यांच्या साहाय्याने एक राजकीय पक्ष स्थापावा आणि दुसर्या पक्षातील नेत्यांबरोबर काम करण्याचा प्रयत्न करावा. आता परिस्थितीचा आढावा घेण्याची वेळ आली आहे.

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर

dd

अखेरचा संदेश

पंतप्रधान नेहरू यांच्याशी मतभेद असलेल्या विचारवंतांचे म्हणणे लोक मुळीच ऐकावयास तयार नाही. साहेब सुस्कारा टाकून म्हणाले, ज्या देशात पूर्वग्रहदूषित मनाचे लोक असतात, त्या देशात जन्म घेणे हे मोठे पाप आहे. मला सर्व बाजूंनी शिव्याशाप खावे लागले तरी मी केलेले कार्य पुष्कळच मोठे आहे. मी माझे कार्य मृत्यूपर्यंत चालू ठेवीन. असे म्हणून ते रडू लागले. एके दिवशी नानकचंद रत्तूंना ते म्हणाले, माझ्या लोकांना सांग की मी जे काही केले आहे ते मी अत्यंत हालअपेष्टा सोसून आणि आयुष्यभर दुःखं भोगून आणि माझ्या विरोधकांशी लढून मिळविले आहे. महत्प्रयासाने हा काफिला जेथे दिसतो तेथे आणून ठेवला आहे. मार्गात काही अडचणी आल्या आणि संकटे आली तरी तो काफिला आता मागे फिरता कामा नये. जर माझ्या सहकार्‍यांना तो काफिला पुढे नेता येत नसेल, तर त्यांनी तो तेथेच ठेवावा. पण काही झाले तरी तो मागे नेता कामा नये. हाच माझ्या लोकांना माझा संदेश आहे.

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर

असाही असतो प्रेमळपणा

बाबासाहेबांच्या प्रेमळपणाच्या पुष्कळ गोष्टी सांगता येतील. एक प्रसंग असा होता.

पहाटेची वेळ होती. पाच वाजले असतील. आमच्या परळच्या आळेच्या दारातून अहो दोंदे, अहो दोंदे असे कुणीतरी हाका मारीत होते. डॉक्टर यावेळी इकडे कुठे? मला आश्चर्य वाटले.

अहो दोंदे, मी चहा प्यायला आलो आहे, असे बोलताच ते जिना चढले. येऊन बसल्यावर मी सहजच येण्याचे कारण विचारले. ते म्हणाले, असे झाले, आमच्या हिंदू कॉलनीमध्ये काम करणारी भंगीण रात्री दोन वाजता मला उठवायला आली. तिच्या नवर्‍याला आदल्या दिवशीच्या संध्याकाळपासून जुलाब-होत होत्या. संध्याकाळी सात वाजता ती आपल्या नवर्‍याला इस्पितळात घेऊन गेली. सात वाजल्यापासून तो रात्रीचे दोन वाजेपर्यंत त्यांनी दादच दिली नाही. बाहेर पडून होता. मी डॉ.जीवरावला सांगावे म्हणून ती मला उठवायला आली. मी मोटरगाडी काढली आणि त्या बाईबरोबर इस्पितळात गेलो. त्या मनुष्याची सोय लावली आणि जाता-जाता तुमच्याकडे डोकवावे असे माझ्या मनात आले, म्हणून तुम्हाला हाका मारल्या.

एके सायंकाळी बाबासाहेब फिरायला निघाले. कडक थंडी पडली होती. वाटेत त्यांना

एक अगदी म्हातारा गृहस्थ आढळला. त्याच्या अंगावर जीर्ण व फाटके कपडे होते. अर्धनग्न होता तो. एका पुलाला टेकून तो थंडीत कुडकूडत उभा होता. त्याचे हातपाय लटपटत होते.

ती अवस्था पाहून बाबासाहेब थबकले. अंगावरचा गरम उंची कोट काढला आणि आपल्या हातांनी त्यांनी त्या म्हातार्‍याच्या अंगात तो कोट घालून दिला. मग त्याला आलिंगन देऊन ते पुटपुटले, या जगात असे कितीतरी लोक थंडीत गारठून मरत आहेत. कितीतरी लोक उपासानं तडफडत मरत आहेत. स्वतःला जे शक्य आहे ते करीत जा.

एके दिवशी त्यांचा कुत्रा काही खाईना, काही पिईना. बाबासाहेब फारच अस्वस्थ झाले.

हवे ते इलाज केले. त्याला हृदयाशी कवटाळून करुण शब्दात ते म्हणाले, असे काय झाले तुला? तुझा हा सत्याग्रह कशासाठी आहेस? हे उपोषण कशासाठी? सांग बाबा, सांग.

बाबासाहेबांचे डोळे पाणावले. आपला प्रेमळ विश्वासू कुत्रा काहीच खात नाही म्हणून तेही दोन दिवस उपाशीच राहिले आणि तिसर्‍या दिवशी सकाळी जेव्हा कुत्राने दुधाबरोबर पाव खाल्ला तेव्हा बाबासाहेब आनंदून गेले.

प्राणिमात्रावरील ही उदात्त दया, निष्ठा!

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; First edition (6 December 2021); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 184 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352203410
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352203413
Item Weight ‏ : ‎ 180 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Importer ‏ : ‎ (PH: 9881745605)
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Majhi Atmakatha माझी आत्मकथा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, Mazi Atmakatha, Inspirational Autobiography of Dr. Babasaheb Ambedkar, Motivational Biography Book in Marathi on Books, dr, डा बाबा साहेब, डॉ भीमराव अम्बेडकर, अंबेडकर पुस्तक मराठी”

Your email address will not be published. Required fields are marked *