Elon Musk Book in Marathi : Business Principles from the World’s Most Powerful Entrepreneur, Alon Biography Translated Books on, इलॉन मस्क Inspirational Autobiography Motivational उद्योजक प्रेरणादायी मराठी पुस्तके, Udyojak Charitra

99.00

Description

 

Elon Musk : Business Principles from the World’s Most Powerful Entrepreneur इलॉन मस्क by Randy Kirk

ElonMuskElonMusk

तुम्ही मस्कच्या तोडीचे उद्योजक असणं अजिबात गरजेचं नाही; किंवा व्यवसायात यश मिळवण्यासाठी त्या तोडीचं द्रष्टेपण अंगी असण्याचीही अजिबात गरज नाही. या पुस्तकात नमूद केलेले अंतर्ज्ञान, सर्व लहान पातळीवरच्या उद्योजकांसाठीच अभिप्रेत आहे. शक्य तेवढी यशश्री मिळवायची असेल, तर तुम्ही आपल्यापुढे जी उद्दिष्टं ठेवता, ती तुम्हाला वाटत असलेली उत्कट ओढ, तुमचं व्यक्तिमत्त्व आणि तुमची यशाची व्याख्या यांना साजेशी असायला हवीत!

मस्कनं या गोष्टी नक्कीच केलेल्या आहेत आणि इच्छा असेल, तर इतर कुणीही त्या गोष्टी नक्कीच करू शकेल.

तुमच्या स्वत:बद्दलचं अंतर्ज्ञान तुम्हाला मिळवून देणं, हा या पुस्तकाचा मूलभूत हेतू आहे. तुम्हाला कोणत्या गोष्टी करण्यात आनंद वाटतो हे शोधून जर तुम्ही या पुस्तकात वर्णन केलेले काही गुण आत्मसात केलेत, तर त्याचा कोणत्याही धंद्याला नक्कीच फायदा होईल आणि त्यामुळे तुमचा नफाही खूप वाढू शकेल. त्यामुळे तुमच्या आयुष्याचा दर्जासुद्धा नक्कीच उंचावेल.

एलॉन मस्क आचरत असलेली सोळा तत्त्वं, जी प्रत्येक उद्योजकाला उद्बोधक ठरतील.

ElonElon

त्याच्या स्वत:च्या शब्दांत सांगायचं तर: ‘जर तुमच्याकडे लक्षवेधी, चित्ताकर्षक माल, आकर्षक किमतीला उपलब्ध नसेल, तर तुमची कंपनी महान असणं शक्यच नाही!’ अशी कंपनी उभारता येण्यासाठी आवश्यक अशी सोळा तत्त्वं किंवा सोळा गुण :

1. कुतूहल असणं

2. निरीक्षणात वाक्बगारी

3. तज्ज्ञ

4. विश्लेषक

5. मोठे प्रश्न विचारता येण्याची क्षमता

6. चाकोरी मोडून बाहेर पडण्याचं धाडस

7. उच्च उद्दिष्टं डोळ्यांपुढे ठेवण्याची धडाडी

8. नेतृत्वगुण

9. माणसं जोडण्याचं कौशल्य

10. लोकांचं मोल आणि महत्त्व जाणण्याची कुवत

11. प्रकल्प कृतीत उतरवण्याचं कौशल्य

12. धोका पत्करण्याचं धाडस

13. अडथळ्यांवर मात करण्याची कुवत

14. दर्जेदार उत्पादन करण्याची क्षमता

15. सतत, थोड्या थोड्या सुधारणा घडवत जाण्याबद्दल आग्रही असणं

16. ध्येयानं पछाडणं आणि त्यासाठी जबरदस्त चिकाटीनं प्रयत्न करणं

आपल्या विचारांचं आपल्यावर कसं नियंत्रण असतं, हे सांगणारं विज्ञान

आपल्या स्वत:च्या विचारमंथनाबाबतचं तुमचं मत हे पुस्तक वाचल्यावर नेहमीसाठी बदलून जाईल. डॉ. ब्रुस एच. लिप्टन या प्रख्यात पेशीशास्त्रज्ञानं आपल्या विचारांचा आपल्या शरीरातल्या पेशींवर कसा प्रभाव पडत असतो, याबद्दलचे धक्कादायक नवीन वैज्ञानिक शोध या पुस्तकामध्ये सांगितले आहेत. मेंदूच्या कार्याच्या जैवरासायनिक परिणामांमुळे पेशी प्रभावित होत असतात. विचारांचा पेशींवर कसा परिणाम होतो, हे लिप्टन यांनी अगदी रेण्वीय पातळीवरच्या घडामोडी समजावून देत स्पष्ट केलं आहे. हलकासा विनोदाचा शिडकावा करणाऱ्या साध्या-सोप्या भाषेत मुद्दा समजावून सांगणं आणि दैनंदिन जीवनातली उदाहरणं देणं ही त्यांच्या लिखाणाची उल्लेखनीय वैशिष्ट्यं.

अ‍ॅपिजेनेटिक्स हे नवं विज्ञान आपल्या वैयक्तिक आयुष्यावर, तसंच संपूर्ण मानवजातीच्या आयुष्यावर कसं परिणाम करतं या संशोधनाचे निष्कर्ष, आपल्या आतापर्यंतच्या जीवनाबद्दलच्या संकल्पनांना आमूलाग्र बदलून टाकणारे आहेत. आपली जनुकं आणि डीएनए आपल्या आयुष्याचं नियंत्रण करीत नाहीत, तर पेशीच्या बाहेरच्या वातावरणातून येणाऱ्या संदेशांमुळे डीएनएचं नियंत्रण होत असतं. पेशीबाहेरच्या वातावरणातून मिळणाऱ्या संदेशांमध्ये आपल्या (सकारात्मक किंवा नकारात्मक) विचारांतून तयार होणाऱ्या ऊर्जातरंगांचाही समावेश असतो, असं लिप्टन म्हणतात.

पेशी विज्ञान आणि क्वांटम फिजिक्सच्या आधारानं केलेलं हे संशोधन कमालीचं आशादायी आहे आणि त्याची सर्वत्र विज्ञान जगतातला क्रांतिकारी शोध, अशी प्रशंसा होत आहे. आपल्या विचारांना योग्य ते वळण देऊन आपल्या आयुष्यात बदल घडवता येतात असं हे संशोधन सांगतं.

Randy KirkRandy Kirk

Randy Kirk

लहानशा व्यवसायांचे मालक असणाऱ्या आणि अनोळखी कार्यक्षेत्रात चाचपडत मुशाफिरी करणाऱ्या व्यावसायिकांसाठी रँडी कर्क हा उत्तम मार्गदर्शक आहे. त्यानं किरकोळ आणि घाऊक विक्री करणार्‍या कंपन्या, आयात-निर्यातीचा व्यवसाय करणार्‍या कंपन्या, उत्पादन करणार्‍या कंपन्या, सल्लागार आणि जाहिरात कंपन्या संस्थापित केल्या आहेत. तो UCLA लॉ स्कूलचा पदवीधर आहे.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; First edition (1 November 2020); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 216 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352202864
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352202867
Item Weight ‏ : ‎ 250 g
Dimensions ‏ : ‎ 20.8 x 13.8 x 1.1 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Importer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India Phone : 9881745605
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Elon Musk Book in Marathi : Business Principles from the World’s Most Powerful Entrepreneur, Alon Biography Translated Books on, इलॉन मस्क Inspirational Autobiography Motivational उद्योजक प्रेरणादायी मराठी पुस्तके, Udyojak Charitra”

Your email address will not be published. Required fields are marked *