Business Biographies of Inspirational Personalities in Marathi (Set Of 3 Combo Pack Books) : Ratan Tata, Narayan Murthy, Dhirubhai Ambani, रतन टाटा, … धीरूभाई अंबानी, मराठी बेस्ट सेलर पुस्तके

399.00

Category:

Description

Price: ₹399.00
(as of Feb 23,2023 17:59:49 UTC – Details)



From the Publisher

Ratan Tata by Sudhir Sevekar

Ratan TataRatan Tata

‘‘आमच्यासाठी दोन दिशादर्शक काटे आहेत. एक काटा परदेशांकडे रोखलेला आहे. परदेशी बाजारपेठांत प्रवेश करणे, तेथील आपला वाटा वाढविणे आणि टाटा उत्पादनांना परदेशी बाजारपेठांतून सन्मानाचे भरीव स्थान मिळवून देणे, याकडे हा काटा निर्देश करतो.

दुसरा काटा भारतावरच रोखलेला आहे. भारतात फार मोठी बाजारपेठ उदयाला येत आहे. या फार मोठ्या बाजारपेठेसाठी विशेष उत्पादने विकसित करणे, त्यासाठी यापूर्वी कोणीही उचलली नसतील, अशी आवश्यक ती पावले उचलणे, दुसर्‍यांचे अनुकरण करणे किंवा त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत चालणे यापेक्षा आपला स्वतंत्र मार्ग स्वत: तयार करणे यावर आमचा भर असेल.

अशा प्रकारे एकाच वेळी परदेशी बाजारपेठ आणि भारतीय बाजारपेठ अशा दोन्हींसाठी टाटा उद्योगसमूह कार्यरत असेल.’’

– रतन टाटा

सुमारे 150 वर्षांची उद्योग पंरपरा असलेल्या टाटा गु्रपचा अध्यक्ष होणे हा खर्‍या अर्थाने काटेरी मुकुट आहे. ही जबाबदारी यशस्वीरीत्या पेलताना रतन टाटा यांनी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कठोरता या बाबी टाटा गु्रपला वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. रतन टाटा यांनी अतिशय कुशलतेने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कंपन्या टेकओव्हर करतानाच माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रात दमदारपणे आघाडी घेतली. टाटा गु्रपची विश्वसार्हता जपत त्यांनी टाटा गु्रपचा विस्तार केला.

रतन टाटा यांनी आपल्या निर्णयक्षमतेने आणि कौशल्याने अतिशय आढव्य असलेल्या टाटा गु्रपमध्ये सळसळते चैतन्य निर्माण केले. अतिशय सहजतेने अविश्वसनीय कामगिरी करणार्‍या यांचे अवघे जीवनच प्रेरणादायी आहे. नैतिकता जपत उद्योगाबरोबर देश आणि समाजाचा विकास साधण्याची परंपरा त्यांनी समर्थपणे चालवली आहे.

सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचे चारचाकी गाडीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक लाखाची कार तयार करण्याचा संकल्प करून, तो प्रत्यक्षात उतरविणारे रतन टाटा यांची औद्योगिक झेप आकाशाला गवसणी घालणारी आहे.

रतन टाटा यांच्या संपूर्ण कारकिर्दीचे ओघवत्या शैलीत लिहिलेले प्रेरणादायी चरित्र.

Narayan Murthy by Rahul Singhal

Narayan MurthyNarayan Murthy

इन्फोसिस म्हणजे एक चमत्कार आहे. 1981 साली अवघ्या 250 डॉलरच्या बीज भांडवलावर सुरू झालेली कंपनी आता जगातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण कंपनी बनली आहे. संयुक्त अमेरिकेत नोंदणी मिळविणारी इन्फोसिस ही पहिली भारतीय कंपनी आहे. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातून भाग-भांडवल मिळवणारी ही पहिली कंपनी आहे. इन्फोसिसचे मुख्य प्रवर्तक असलेल्या नारायण मूर्ती यांची जीवन गाथा प्रेरणादायी आहे. अगदी शून्यातून उद्योग उभा करणे आणि प्रामाणिकपणा, जिद्द तसेच चिकाटीच्या जोरावर त्यात यश मिळविणे ही असामान्य कामगिरी मूर्ती यांनी केली आहे.

नारायण मूर्ती : एक प्रेरणादायी व्यक्तितत्त्व. उद्योग व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना सॉफटवेअर उद्योगाची त्यांनी या देशात मुहूर्तमेढ रोवली. देशातील बहुतेक उद्योजक जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेला विरोध करीत असताना मूर्ती यांनी जागतिकीकरणाचा आपल्या उद्योगाच्या भरभराटीसाठी उपयोग करून घेतला.

एक व्यक्ती म्हणूनही मूर्ती यांचे जीवन प्रेरणादायी आहे. डोक्याने उद्योजक आणि हृदयाने समाजवादी असलेल्या मूर्ती यांनी आपल्या उद्योगातील कर्मचार्‍यांना भागधारक होण्याची संधी उपलब्ध करून दिली. आपल्या वैयक्तिक संपत्तीचा जास्तीत जास्त वाटा समाजासाठी, विद्यार्थी आणि गोरगरिबांच्या विकासासाठी खर्च करून मूर्ती यांनी वेगळा आदर्श घालून दिला आहे.

यशस्वी उद्योजक आणि करोडो रूपयांच्या संपत्तीचा मालक बनल्यानंतरही मूर्ती यांनी साधी राहण सोडली नाही. समाजकारणात महात्मा गांधीनी घालून दिलेले आदर्श औद्योगिक जीवनात जपले.

तरुणांना दिशो देणारे विचार समजून घेण्यासाठी मूर्ती यांचे चरित्र मुळातूनच वाचायला हवे.

Dhirubhai Ambani

Dhirubhai Ambani Dhirubhai Ambani

धीरूभाई अंबानी यांनी उद्योग व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना तसेच कोणत्याही प्रकारचे आर्थिक पाठबळ आणि पुरेसं शिक्षण नसताना केवळ इच्छाशक्ती, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर रिलायन्स उद्योगसमूहाची स्थापना केली. इतकेच नाही तर, या उद्योगाला यशाच्या शिखरावर पोहोचविले. उद्योजकाने केवळ आपल्या उद्योगाचाच विचार करावा, अशी धारणा असलेल्या धीरूभाईंनी कुणालाही आश्चर्य वाटावे, असे रिलायन्सचे साम्राज्य उभे केले. धीरूभाईंचे विचार, त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांची निर्णय घेण्याची क्षमता यातच त्यांना मिळालेल्या असामान्य यशाचे रहस्य दडलेले आहे. ते रहस्य जाणून घेण्यासाठी धीरूभाईंचे चरित्र समजून घेणे महत्त्वाचे.

पी. सी. अलेक्झांडर, महाराष्ट्राचे राज्यपाल

‘‘भारतीय उद्योगाच्या क्षितिजावर या तार्‍याचा तीन दशकांपूर्वी उदय झाला होता. आपली अजोड क्षमता. आपली मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द या बळावर ते आकाशात सदैव चमकत राहिले.’’

राहुल बजाज, अध्यक्ष बजाज ऑटो

‘‘भारताला जागतिक स्थान मिळवून देण्याचे स्वप्न पाहणारे ते एकमेव उद्योजक होते.’’

के. के. बिर्ला, उद्योजक, माजी राज्यसभा सदस्य

‘‘आपल्याकडे असलेल्या सर्वसाधारण क्षमतांचा योग्य प्रकारे वापर करण्यास त्यांनी देशातील अनेक पुरुष आणि महिलांना शिकविले.’’

माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन

‘‘अंबानी यांनी जागतिक बाजारपेठेत स्वत:चे स्थान निर्माण करणे हे त्यांच्या उद्योगीपणाचे उदाहरण आहे. त्यांनी देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.’’

सोनिया गांधी

‘‘आज रिलायन्स भारतीय उद्योगासाठी एक उदाहरण आहे, तर श्री. अंबानी कॉपरेचर यशासाठी आदर्श आहेत.’’

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख

‘‘श्री अंबानी यांनी आपल्या प्रयत्नांनी आणि कुशाग्र बुद्धीच्या मदतीने भारतीय उद्योगाला विश्वाच्या नकाशावर महत्त्वपूर्ण स्थान मिळवून दिले.’’

उद्योग-व्यवसायाची कुठलीही परंपरा नसताना किंवा उद्योगासाठी लागणारे व्यावसायिक शिक्षण नसताना केवळ जिद्दीच्या जोरावर आपला स्वत:चा उद्योग सुरू करून यशाचे एव्हरेस्ट गाठणारे धीरूभाई अंबानी यांचे चरित्र प्रेरक आणि स्फूर्तिदायक आहे. अगदी सुरूवातीला ज्या मुंबईने त्यांना जगण्यासाठी आवश्यक असणारे काम दिले नाही त्याच मुंबईत धीरूभाईंनी आपले उद्योगसाम्राज्य उभे केले. एकानंतर एक नवे उद्योग सुरू करताना आपल्या उद्योगांचे इतरांवरील अवलंबित्व कमी करण्याची एक नवी पद्धत त्यांनी सुरू केली. केवळ जिद्दीच्या जोरावर आपली सारी स्वप्ने पूर्ण करणार्याग धीरूभाईंची जीवनकथा खूप काही सांगणारी रोमांचक आणि अद्भुत आहे. शून्यातून श्विस उभे करताना करावे लागणारे प्रयत्न, त्यासाठी लागणारा विचार आणि खंबीर मनोवृत्ती हे समजून घेण्यासाठी धीरूभाईंचे चरिद्धा वाचायलाच हवे. आपल्या यशात सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांना सामील करून घेण्याची त्यांची कल्पकताही थक्क करून सोडणारी आहे. सर्वसामानय मध्यमवर्गीय गुंतवणूकदाराला भांडवलदार करून श्रीमंत होण्याचा मार्ग उपलब्ध करून देणार्यां धीरूभाईंबाबत हे सारे समजून घ्यायलाच हवे.

Subhash Chandra Goyal by Sudhir Sevekar

Subhash Chandra GoyalSubhash Chandra Goyal

`Some see the things and ask why?

Entrepreneur dreams the things and asks, why not?’

असे `why not’ म्हणणारे आणि वरील लक्षणे लागू पडणारे एक उद्योजक जे आपल्या धडपडीतून उद्योगपती झाले ते म्हणजे सुभाषचंद्रा.

खरे तर यशस्वी उद्योजक म्हणजे 1% प्रेरणा आणि 99% मेहनत हे गणित असते आणि त्यांनी ते सोदाहरण स्पष्ट केले. हे सर्व कसे घडले हे प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी या धडाडीच्या उद्योजकाची जीवनगाथा आपल्याला या उत्कृष्ट चरित्रात वाचायला मिळणार आहे. लेखक श्री. सुधीर सेवेकर यांनी प्रत्यक्षात हे चरित्र विस्ताराने मांडून विविध अडचणी, कसोटीचे प्रसंग आणि व्यवसायातील चढउतार यातून सुभाषचंद्रांनी कसे मार्ग काढले ते सोहाहरण स्पष्ट केले आहे. व्यवसायातील सुरुवातीच्या अडचणी, रशियाला बासमती तांदूळ निर्यात करताना आलेला स्पर्धकांचा अनुभव, व्यवसायात एका व्यक्तीने दिलेल्या त्रासापायी पुढचे पांढरे झालेले केस, एस्सेल वर्ल्ड च्या निर्मितीच्या वेळची दफ्तर दिरंगाई, लालफितीचा अनुभव, टीव्ही चॅनेल्स स्थापन करताना आलेला मर्ढोक आणि अन्य परदेशी उद्योगपतींचा अनुभव आणि त्यावर केलेली मात, यावरून कोणत्या परिस्थितीतून चरित्रनायकाला जावे लागले आणि त्यावर त्यांनी कशी मात केली याची कल्पना येते. लेखकाने हे सर्व अत्यंत मार्मिकपणे मांडले आहे.

हरियाणातील लहानशा गावातला एक मुलगा भारतातील पहिल्या १८ श्रीमंतांत केवळ पाच दशकांत भरारी घेतो हे अविश्वसनीय वाटणारे सत्य प्रत्यक्षात उतरवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे या चरित्राचे नायक सुभाषचंद्रा. त्यांना ‘भारतातील माध्यमसम्राट’ म्हणूनही ओळखले जाते. १७ व्या वर्षी खिशात फक्त १७ रुपये असताना, शिक्षण अर्धवट सोडून वडिलांच्या तोट्यात गेलेल्या व्यवसायाला पुनश्च उभे करण्याची जिद्द बाळगत त्यांनी आपल्या उद्योजकीय कामगिरीचा श्रीगणेशा केला. अवघ्या काही वर्षांत त्यांनी व्यवसाय केवळ नफ्यातच आणला नाही, तर पुढच्या एका दशकात त्यांनी आपल्या व्यवसायाला १०० कोटी रुपयांच्या व्यवसायात बदलले आणि आज एस्सेल ग्रूप या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या; तसेच केवळ भारतभरच नव्हे तर जगभर विस्तार असलेल्या विशाल उद्योगसमूहात त्याचे रूपांतर केले. एखाद्याला अडथळा वाटणारी कोणतीही संधी त्यांनी बाजूला सारली नाही तर तिचा समर्पक उपयोग करून घेतला. मग ती वडिलांच्या व्यवसायातील तोट्याची परिस्थिती असो, अर्धवट सोडून द्यावे लागलेले शिक्षण असो वा पुढे उद्योगात आलेल्या अनेक आव्हानात्मक अडचणी असोत, त्यांनी सातत्याने उद्योगवृद्धीचाच ध्यास घेतला आणि याच ध्यासातून त्यांनी विविध क्षेत्रांत उच्चपातळी गाठलेले २० हून अधिक उद्योग उभे केले, ज्यांनी आज जगभर नावलौकिक मिळवला आहे

Indian Business Guru by Sudhir Sevekar

Indian Business GuruIndian Business Guru

‘इंडियन बिझनेस गुरू’ या प्रस्तुत पुस्तकात मी एकूण चौदा महत्त्वपूर्ण भारतीय उद्योजकांच्या जीवनकार्याविषयी लिहिले आहे. या प्रत्येक उद्योजकाच्या कारभाराची उलाढाल ही कोटींच्या घरात असते. शेकडो – हजारो लोक त्यांच्या औद्योगिक कुटुंबात काम करतात. तितक्याच लोकांना अप्रत्यक्षरीत्या रोजगारही मिळालेला आहे. यातील प्रत्येक उद्योजकावर स्वतंत्र पुस्तक लिहावे असेच त्यांचे कार्यकर्तृत्व आहे.

जोखीम घेत, नव्या वाटा तयार करणारा आणि समाजाला एक घर पुढे नेणारा धडाडीचा माणूस म्हणजे उद्योजक! संकरित बी-बियाणे उद्योगाची भारतात सुरुवात करणारे बारवाले असोत की करमणुकीलाच उद्योग मानून त्यात मनोभावे काम करणारे सुभाषचंद्र गोयल असोत. या पुस्तकातील चौदाही उद्योजकांनी आपले जीवन समृद्ध करण्यात आणि समाजाला पुढे नेण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.

हजारो कोटींची उलाढाल आणि हजारोंना रोजगार देणाऱ्या या उद्योजकांची वाटचाल विलक्षण रोमहर्षक आणि प्रेरणादायी आहे. दीपस्तंभाप्रमाणे प्रकाश देणारी आहे. या प्रकाशात उमलत्या पिढीस उद्योजकतेची प्रेरणा मिळून, त्यांच्यातील सर्जनशीलता आणि कार्यकर्तृत्व चहुअंगाने फुलून आले, तर ते देशाच्या सर्वांगीण विकासासाठी हवेच आहे. उद्योजकीय विषयावर गेली अनेक वर्षे सातत्याने लिखाण करणारे ‘साकेत’चे एक सिद्धहस्त लेखक सुधीर सेवेकर यांचे हे पुस्तक म्हणूनच महत्त्वाचे आहे. अत्यंत नेमकेपणाने त्यांनी निवडलेल्या उद्योजकांची गुणवैशिष्ट्ये, कार्यकर्तृत्व आणि मर्म शब्दबद्ध केलेले आहे. युवावर्गासह सर्व स्तरातील, सर्व प्रकारच्या वाचकांना प्रस्तुत पुस्तक निश्चितच आवडेल. तसेच प्रगतीचा ध्यास घेतलेल्या प्रत्येक सक्रिय माणसाने हे पुस्तक अवश्य वाचले पाहिजे!

ASIN ‏ : ‎ B09CQRSY1W
Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt Ltd; First edition (1 January 2021); (PH: 9881745605) 
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 432 pages
Item Weight ‏ : ‎ 420 g
Dimensions ‏ : ‎ 20.8 x 13.8 x 2.5 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Importer ‏ : ‎ (PH: 9881745605) 
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Marathi Book

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Business Biographies of Inspirational Personalities in Marathi (Set Of 3 Combo Pack Books) : Ratan Tata, Narayan Murthy, Dhirubhai Ambani, रतन टाटा, … धीरूभाई अंबानी, मराठी बेस्ट सेलर पुस्तके”

Your email address will not be published. Required fields are marked *