Sam Walton Biography, Walmart Store Book in Marathi Language, Great Business Personalities Books, Made In America Success Stories
₹220.00
Description
Price: ₹220.00
(as of Feb 23,2023 13:10:33 UTC – Details)
From the Publisher
Sam Walton Biography
“रूढ विक्रीतंत्रांमध्ये आमूलाग्र बदल करत रिटेल बिझनेसचा चेहरामोहरा बदलणारा क्रांतिकारी उद्योजक सॅम वॉल्टन… वॉलमार्टचा प्रणेता… साधारण सात दशकांपूर्वी, मॉल हा शब्दही बहुधा अस्तित्वात नव्हता तेव्हा वॉलमार्टची स्थापना करून सॅमने रिटेल व्यवसायाच्या क्षेत्रात क्रांती केली. तत्कालीन कंपन्या ज्यावेळी ग्राहकांना मोठ्या सवलतीच्या दरांत वस्तूंची विक्री करण्यास धजावत नव्हत्या त्यावेळी सॅमने थेट उत्पादनकर्त्यांकडून ठोक भावात मोठ्या प्रमाणावर वस्तूंची खरेदी करून तो फायदा ग्राहकांच्या खिशात सरकवला. …आणि हाच त्याच्या भव्य जागतिक यशाचा मास्टरस्ट्रोक ठरला. आज जगभरात वॉलमार्टची १०,००० हून अधिक स्टोअर्स असून ही एक सर्वोच्च दर्जाची सेवा पुरवणारी ग्राहककेंद्रित कंपनी म्हणून ओळखली जाते. जगाच्या नकाशावर स्वतःचं इतकं ठळक स्थान निर्माण करण्यामागे दडली आहेत सॅमची असंख्य तत्त्वं… त्याच तत्वांचा वेध घेत वॉलमार्टच्या स्टोअरची संस्कृती उलगडणारं हे अनोखं पुस्तक…”
‘ग्राहक हा बाजारपेठेचा राजा असतो’ ही उक्ती आपण कायमच ऐकत आलोय. पण ही उक्ती प्रमाण मानून आचरणात आणणारा, प्रत्यक्ष जगणारा धडाडीचा उद्योजक म्हणजे सॅम वॉल्टन. किरकोळ विक्री अर्थात रिटेल बिझनेसच्या क्षेत्रातील वस्तूंच्या भव्य दालनांची सुरुवात सॅम वॉल्टनने केली. ग्राहकांना उपयुक्त ठरणारी असंख्य उत्पादने एका छताखाली उपलब्ध करून देणारे हे उद्योगक्षेत्र. ज्याकाळी ‘मॉल’ हा शब्दही फारसा प्रचलित नव्हता, तेव्हा एका द्रष्ट्या उद्योजकाने थेट उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी करून त्यांची ग्राहकांना किफायतशीर किमतीमध्ये विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला. अनेक ग्राहकाभिमुख योजना राबवण्याबरोबरच आपल्या कर्मचार्यांना कामाचे स्वातंत्र्य देत सुयोग्य मोबदलाही दिला. मोठमोठ्या दालनांमध्ये जाऊन ग्राहकांना आपल्या आवडीच्या वस्तू स्वत: निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. आनंददायी खरेदीची ही संकल्पना ग्राहकांना इतकी आवडली की, लवकरच संपूर्ण अमेरिकेत या दालनांचे विस्तीर्ण असे जाळे विणले गेले. आज जगभरातील ग्राहक या दालनांशी जोडले गेले असून अशा विक्री दालनांची संख्या दहा हजारांच्या पलीकडे आहे.
रिटेल बिझनेसचा चेहरामोहरा बदलणारे आणि देश-विदेशातही विक्री दालनांचे जाळे उभे करण्याचे एवढे अफाट कार्य एवढ्या कमी वेळात त्याने केले तरी कसे? सॅम वॉल्टनचे चरित्र आणि त्याने उभारलेल्या वॉलमार्टच्या यशस्वितेची कहाणी पण तेवढीच रंजक आहे. हे पुस्तक सॅमचे चरित्र म्हणावे की वॉलमार्टच्या उत्तुंग भरारीची कथा हा प्रश्न पडावा एवढे ते एकमेकांमध्ये एकरूप झाले आहेत. कारण सॅमचे अवघे आयुष्य म्हणजे वॉलमार्ट आणि वॉलमार्टची उभारणी, विस्तार, हजारो शाखांचे जाळे या सर्व प्रवासाच्या केंद्रस्थानी आहे सॅम वॉल्टन. ‘वॉलमार्ट’ या आपल्या स्टोअरद्वारे त्याने केवळ स्वत:चा व्यवसायच उभा केला नाही तर जगभरातील उद्योजकांना आधुनिक युगातीत विक्रीतंत्रं आणि व्यवस्थापन कौशल्यांचे बहुमूल्य असे धडेही दिले. सॅमची माणसे ओळखण्याची पारख, त्याची निर्णयक्षमता, भव्य स्वप्नं पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची जिद्द आणि त्यासाठी अपार कष्ट करण्याची तयारी म्हणजे त्याच्या लखलखत्या कर्तृत्वाचा भक्कम पाया होय.
वॉलमार्टच्या घवघवीत यशामागे कंपनीच्या धोरणांचा मोठा वाटा आहे. ग्राहकांना वाजवी किमतीत दर्जेदार उत्पादन देऊ करणे हे वॉलमार्टचे तत्त्व. आपल्या कंपनीतील कर्मचार्यांनी कंपनीचे समभागधारक व्हावे ही सॅम वॉल्टन यांची जगावेगळी दृष्टी होती, जी प्रत्यक्षात राबवण्यात आली. त्याचबरोबर व्यवस्थापकांबरोबर नफा वाटून घेणे हेसुद्धा त्यांचे विशेष धोरण होते. त्यामुळे सहकार्यांमध्ये समर्पित भावाने काम करण्याची वृत्ती जोपासली गेली. अशी अनेक व्यवस्थापकीय कौशल्ये या पुस्तकातून आपल्यासमोर ठळकपणे उलगडतील.
सॅम वॉल्टनच्या जीवनाची ही रंजक सफर आणि वॉलमार्टच्या भरारीचा प्रवास वाचकांना आनंद देण्यासोबतच प्रेरणा देणारा, समृद्ध करणारा ठरेल अशी आशा आहे.
– सौ. प्रतिमा साकेत भांड
असे म्हणतात की, युद्धे प्रथम टेबलावर लढवली जातात आणि नंतर युद्धभूमीवर. म्हणजेच त्यांची सुरुवात कोणाच्या तरी डोक्यात प्रथम होते, टेबलाभोवती चर्चा होते, व्यूहरचना आखली जाते आणि मग युद्ध होते. असेच उद्योगांच्या बाबतीतही म्हणता येईल. एखादा संभाव्य उद्योजक स्वत: रंगवलेल्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धडपड चालू करतो, त्यात टक्केटोणपे खातो पण नेटाने पाय रोवून उभा राहतो आणि त्यातून मग एक प्रचंड उद्योगव्यवसाय उभा राहतो, विस्तारतो. एखाद्या लहानशा प्रवाहात झरे, ओढे, नाले आणि पुढे उपनद्या येऊन मिळाल्या की, त्याचे महानदीत रूपांतर होते तसे.
हेच आता 27 देशांत पसरलेल्या, 22 लाखांहून अधिक जणांना थेट रोजगार आणि ग्राहकांना विविध वस्तू आणि सेवा पुरवणार्या, आणखी लक्षावधी लोकांना अप्रत्यक्षरीत्या रोजगार उपलब्ध करून देणार्या, हजारो उद्योगव्यवसायांना हातभार लावणार्या ‘वॉलमार्ट’ उद्योगाने केले आहे. लहानपणापासूनच आपल्यातले नेतृत्वगुण वाढवायचे आणि किरकोळ विक्रीच्या क्षेत्रात आपले करिअर घडवायचे असा निश्चय केलेल्या सॅम वॉल्टन या पंचविशीतल्या तरुणाने या किरकोळ विक्रीच्या क्षेत्रातील साखळी स्टोअर्सची मुहूर्तमेढ रोवली. त्याआधी त्याने जाणीवपूर्वक अशाच अन्य स्टोअर्समध्ये या क्षेत्रातील कार्यानुभव घेतला आणि मग आपला उद्योग चालू केला. उद्योगात येणार्या समस्या जसे भांडवल, जागा, सहायक माणसे आणि उद्योगातील अडचणी, त्यालाही आल्या. पण त्यावर त्याने नेटाने मात केली आणि पुढील 5 दशकांत आपला हा उद्योगव्यवसाय आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला.
एखाद्या उद्योगव्यवसायाचे यश मोजताना आर्थिक उपलब्धीबरोबरच त्यातून इतरांनीही स्फूर्ती, प्रेरणा घेतली का हा निकष लावला जातो. त्या दृष्टीनेही पाहिले तर वॉलमार्टचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून अन्य अनेक उद्योगव्यवसाय उभे राहिलेले दिसतात.
या पुस्तकात सॅम, त्याची वॉलमार्ट साखळी या दोघांच्या विकासाची संयुक्त कहाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीपासून सॅमच्या आणि नंतर वॉलमार्टच्या विकासाच्या या कहाण्यांतून आपल्याला बरेच काही शिकता येईल. त्याची यशोगाथा, त्याने जोपासलेल्या आणि जाणीवपूर्वक वाढवलेल्या कार्यसंस्कृती आणि कार्यपद्धती, विस्तार करताना आलेल्या अडचणी आणि त्यातून काढलेले मार्ग, कंपनी सार्वजनिक करण्यासाठी नेटाने केलेले प्रयत्न, या उद्योगाचा आजचा व्याप, त्याची आकडेवारी, भारतात विस्तारासाठी चालवलेले प्रयत्न आणि हे सर्व करताना जोपासलेली सेवाभावी कार्याची बांधिलकी यांचे विहंगम वर्णन इथे वाचायला मिळेल.
– डॉ. सुधीर राशिंगकर
डॉ. सुधीर राशिंगकर
· ‘व्यवसाय व्यवस्थापन’ या विषयात पुणे विद्यापीठातून ‘‘विद्या-वाचस्पती’’ (पीएच.डी.)
· व्यवस्थापन क्षेत्रात संशोधकांचे मार्गदर्शक म्हणून टिळक महाराष्ट्र विद्यापीठात काम.
· गेली चाळीसहून अधिक वर्षं अनेक वृत्तपत्रे व अन्य नियतकालिकांतून सातत्याने विविध विषयांवर स्तंभलेखन.
· 30 हून अधिक पुस्तके प्रकाशित.
· काही वर्षं तंत्रज्ञ अधिकारी म्हणून कूपर इंजिनिअरिंग व टेल्को (आता टाटा मोटर्स) मध्ये काम केल्यावर 1975 पासून स्वतंत्र व्यवसायात कार्यरत.
· उच्च तंत्रज्ञानाच्या शिक्षण व संशोधनासाठी लागणार्या यंत्रसामग्री व उपकरणांच्या विपणनाचे भारतभर व शेजारील देशांत काम.
· ‘प्रकल्प व्यवस्थापनाच्या’ क्षेत्रात काही परदेशी कंपन्यांबरोबर काम. गेली चाळीसहून अधिक वर्षं संपूर्ण भारतभर व अन्य पस्तीसहून अधिक देशांत विस्तृत भ्रमण. रोटरी इंटरनॅशनलचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व अन्य अनेक पदांवर काम.
· उत्कृष्ट कामाबद्दल रोटरी इंटरनॅशनल व रोटरी फाउंडेशनचा पुरस्कार प्राप्त. इतर अनेक सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक संस्था-संघटनांत विविध पदांवर कार्यरत.
Publisher : Saket Prakashan Pvt Ltd (1 January 2022)
Paperback : 216 pages
ISBN-10 : 9352203453
ISBN-13 : 978-9352203451
Reading age : 15 years and up
Item Weight : 220 g
Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin : India
Reviews
There are no reviews yet.