Shetkaryacha Asud शेतकऱ्याचा आसूड Mahatma Jyotiba Phule Books, Jyotirao Fule Book in Marathi Shetkaryancha Asood शेतकऱ्यांचा असूड, महात्मा ज्योतिबा फुले बुक पुस्तक Jotiba Jotirao, Savitribai Phule Jyoti Rao Phulle Aasud सावित्रीबाई, सावित्री बाई, Gulamgiri, गुलामगिरी, Sarvajanik Satyadharma सार्वजनिक सत्यधर्म

99.00

Category:

Description

Price: ₹99.00
(as of Feb 23,2023 04:14:09 UTC – Details)



From the Publisher

Shetkaryacha Aasud by Jotirao Govindrao Phule

Shetkaryacha AasudShetkaryacha Aasud

भारत हा शेतीप्रधान देश असल्याची चर्चा येथे पूर्वापार सुरू असली तरी शेती आणि शेतकरी यांच्या प्रश्नांना मध्यवर्ती ठेवून त्याविषयी प्रत्यक्ष निरीक्षण, अभ्यास आणि चिंतन करून एक समग्र व सुसंगत मांडणी करण्याचा पहिला मान महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतदेशात जोतीरावांनाच द्यावा लागतो. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी हा तसा तर फुल्यांच्या सगळ्याच लेखनात वारंवार डोकावणारा विषय होता, पण शेतकर्‍याचा असूड पुस्तकात त्यांनी तोच एक विषय घेऊन त्याच्याशी संबंधित शेतीचा घसरता दर्जा व घटते उत्पादन, तिच्यावर पडणारा अवाजवी बोझा, डोईजड रयतवारी महसूलपद्धती, सक्तीची व निष्ठूर सारावसुली, दुष्काळ, सावकारी पाश, जमिनींचे भाऊहिस्से व न कसणार्‍या वर्गाकडे होऊ लागलेले जमिनींचे हस्तांतरण, जंगलविषयक जाचक कायदे, शेतकर्‍यांचा कर्जबाजारीपणा, कब्जेदलालीत होणारी त्यांची चौफेर फसवणूक, नैतिक अध:पतन व मानसिक भ्रमिष्टावस्था इत्यादी गोष्टींचे विस्ताराने वर्णन केले आहे.

जोतीराव फुले यांनी ‘शेतकऱ्याचा असूड’ हे पुस्तक १८७३ मध्ये लिहिले. आज इतक्या वर्षांनंतर आणि इतर अनेक संपादने उपलब्ध असताना, त्या पुस्तकाचे आवर्जून नव्याने संपादन करण्याची गरज काय, असा प्रश्न कोणाला पडू शकेल; पण थोडा विचार केल्यास त्या प्रश्नाचे उत्तरही सापडू शकेल. ‘असूड’ लिहिला गेला त्या वेळी देशातील शेतकऱ्यांची जी स्थिती होती, त्यापेक्षा आजही ती मूलतः निराळी नाही. असलीच तर ती अधिकच बिघडली आहे, हे गेल्या काही वर्षांत दीड लाख शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांवरून सहज ध्यानात येऊ शकेल. या देशातील कोरडवाहू शेतकऱ्यांचे प्रश्न आवर्जून सोडवले गेल्याखेरीज देशाला भवितव्य नाही, हे जोतीरावांचे निदान आजही तितकेच यथार्थ आहे. तसेच ते प्रश्न सोडविण्याची दिशा काय असू शकते, याचा जोतीरावांनी केलेला ऊहापोह आजसुद्धा मार्गदर्शक ठरणार आहे. याचा अर्थ असा, की भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या चौसष्ट वर्षांपूर्वी जोतीरावांनी या पुस्तकात जे सांगितले होते ते आज स्वातंत्र्य मिळून चौसष्ट वर्षे उलटत आल्यानंतरही तेव्हाइतकेच महत्त्वाचे आहे, एवढे एक कारणही त्या पुस्तकाचे नव्याने संपादन करण्यासाठी पुरेसे आहे.

– भास्कर लक्ष्मण भोळे

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; Eighth edition (1 January 2017); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 128 pages
ISBN-10 ‏ : ‎ 8177865854
ISBN-13 ‏ : ‎ 978-8177865851
Item Weight ‏ : ‎ 130 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Importer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India Phone : 9881745605
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Shetkaryacha Asud शेतकऱ्याचा आसूड Mahatma Jyotiba Phule Books, Jyotirao Fule Book in Marathi Shetkaryancha Asood शेतकऱ्यांचा असूड, महात्मा ज्योतिबा फुले बुक पुस्तक Jotiba Jotirao, Savitribai Phule Jyoti Rao Phulle Aasud सावित्रीबाई, सावित्री बाई, Gulamgiri, गुलामगिरी, Sarvajanik Satyadharma सार्वजनिक सत्यधर्म”

Your email address will not be published. Required fields are marked *