Kam Karnyache Niyam: Eat That Frog – Marathi
₹144.00
Description
Kam Karnyache Niyam: Eat That Frog by Brian Tracy
Price: ₹144.00
(as of Feb 23,2023 17:12:22 UTC – Details)
From the Publisher
मोठे यश, सन्मान, आदर, समाजातील मान्यता आणि आयुष्यातील आनंदाची एकच गुरुकिल्ली आहे. संपूर्ण एकाग्रतेने आपल्या सर्वांत महत्त्वपूर्ण कामावर लक्ष केंद्रित करून ते उत्कृष्टपणे करण्याची आणि ते पूर्णत्वास नेण्याची तुमची क्षमता. हा सिद्धांतच या पुस्तकाचा आत्मा आणि गाभा आहे.
हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश आहे, चांगल्याप्रकारे कसे जगावे याबद्दल मार्गदर्शन करणे. या पुस्तकात तुम्हाला कारकीर्दीत वेगाने पुढे कसे जावे आणि त्याचबरोबरच तुमचे वैयक्तिक जीवन आनंदी आणि अधिक एकवीस सर्वांत शक्तीशाली सिद्धांत आहेत. हे सिद्धांत वैयक्तिक परिणामकारकतेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
या पद्धती आणि तंत्र व्यवहारोपयोगी, यशस्वी ठरलेल्या आणि झटपट परिणाम देणार्या आहेत.
या पुस्तकात दिलेला प्रत्येक विचार तुमची उत्पादकता, कार्यकुशलता आणि योगदान वाढविण्यास मदत करेलं आणि तुम्ही जे काही कराल ते उत्कृष्ट होऊन तुम्हाला मौल्यवान बनवेल. यातील बर्याचशा कल्पना तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनातही अवलंबू शकता.
तुम्ही जितक्या वेगाने हे शिकाल आणि त्याचा वापर कराल, तेवढ्याच वेगाने आयुष्यात पुढे जाल याची खात्री आहे!
सर्वांत महत्त्वाची कामं करायला शिका – आजच!
आपल्याकडे “करणे बाकी” यादीतील सर्व कामं करण्यासाठी कधीच पुरेसा वेळ नसतो आणि भविष्यातदेखील नसेल. यशस्वी व्यक्ती सर्वच काम स्वतः करण्याचा प्रयत्न करीत नाहीत. ते सर्वांत महत्त्वाच्या कामांवर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्याचे कसब शिकतात आणि चिकाटीने ती कामे पूर्ण करतात.
एक जुनी म्हण आहे – जर तुम्ही दररोज सकाळी सर्वप्रथम एक जिवंत बेडूक गिळू शकलात, तर तुम्हाला दिवसभर या गोष्टीचे समाधान राहील की, तुमच्यासोबत त्या दिवशी यापेक्षा अजून वाईट काही होऊ शकत नाही. “बेडूक गिळणे” याची तुलना दिवसातील सर्वांत आव्हानात्मक कामाशी करा – ज्या कामामध्ये तुमची टाळाटाळ करण्याची शक्यता सर्वांत जास्त असेल; पण कदाचित त्याचाच तुमच्या आयुष्यावर सर्वांत जास्त सकारात्मक प्रभाव पडेल. हे पुस्तक सांगेल की तुमची सर्वांत महत्त्वाची कामे कशी संपवावीत आणि प्रत्येक दिवसाची आखणी कशी करावी. याने तुम्ही फक्त वेगाने कामं करणेच शिकणार नाहीत तर त्याबरोबरच योग्य तीच कामे करायला शिकाल.
बेस्टसेलिंग लेखक ब्रायन ट्रेसी वेळ व्यवस्थापनाचे सर्वांत महत्त्वाचे गुपित सांगतात जे अत्यावश्यक आहे : निर्णयशक्ती, शिस्त आणि संकल्प. या नवीन व सुधारित आवृत्तीमध्ये ते तंत्रज्ञानाविषयी अगदी नवीन माहिती सांगतात की, तुम्ही कशाप्रकारे तंत्रज्ञानाला तुमच्या वेळेवर स्वार होऊ देऊ नये. आजपासूनच टाळाटाळ सोडणे आणि जास्त महत्त्वाची कामे सर्वप्रथम करण्यासाठी ते व्यवहारोपयोगी पायऱ्यांविषयी विस्तृत माहिती देतात.
ब्रायन ट्रेसी
ब्रायन ट्रेसी हे मानवी क्षमता आणि वैयक्तिक परिणामकारकता विकासाच्या क्षेत्रात अमेरिकेतील अधिकारी व्यक्तींपैकी एक आहेत. ते दरवर्षी अडीच लाखांहून अधिक व्यक्तींना वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासंबंधी मार्गदर्शन करतात. ट्रेसी यांनी अनेक लोकप्रिय पुस्तके लिहिली ज्यामध्ये मॅक्सिमम अचीव्हमेंट, गोल्स आणि द 100 अॅब्सोलूटली अनब्रेकेबल लॉज ऑफ बिजनेस सक्सेस यांचा समावेश होतो. याशिवाय त्यांचे अनेक बेस्टसेलिंग ऑडिओ प्रोग्राम्स आहेत ज्यामध्ये ‘द सायकॉलॉजी ऑफ अॅचीव्हमेंट आणि हाऊ टू स्टार्ट अॅण्ड सक्सीड इन युअर ओन बिजनेस’ हे समाविष्ट आहेत.
Publisher : Saket Prakashan Pvt Ltd; Second edition (1 January 2014)
Language : Marathi
Paperback : 144 pages
ISBN-10 : 8177867660
ISBN-13 : 978-8177867664
Item Weight : 230 g
Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin : India
Reviews
There are no reviews yet.