Chhatrapati Shivaji Maharaj: Vyavasthapan Guru ani Vyuharachanakar Book in Marathi छत्रपती शिवाजी महाराज, मराठी पुस्तक, Biography Books, शिवचरित्र पुस्तके, Shivcharitra
₹221.00
Description
Price: ₹221.00
(as of Feb 23,2023 17:43:23 UTC – Details)
Chhatrapati Shivaji Maharaj : Vyavasthapan Guru ani Vyuharachanakar
शिवरायांची व्यूहनीती यशस्वी ठरली ती त्यांच्या व्यवस्थापकीय कौशल्यामुळे. आपल्या अजोड व्यवस्थापकीय कौशल्याच्या बळावर त्यांनी आपल्या शत्रूंना नामोहरम केले व स्वराज्याची घडी उत्तम बसविली. उत्तम व्यवस्थापनामध्ये व्यूहरचना व व्यवस्थापन यांचा परस्परांतील मेळ, प्रसंगनिष्ठ चतुराई, साहाय्यक संघ, प्रकल्पाची पूर्वतयारी, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तडीस नेण्यात येणारी कामे, किती महत्त्वाची भूमिका बजावतात हे शिवरायांनी दाखवून दिले.
स्वतःजवळ कुठलीही पुरेशी साधनसामग्री नसताना, बाकीचे मराठा सरदार परकीयांसमोर नतमस्तक होत असताना नि सारा समाज संभ्रमित-गलितगात्र झालेला असताना शिवाजी महाराजांनी जे ‘कल्पक धाडस’ केले, त्या धाडसाच्या व्यूहरचना-प्रक्रिया आजच्या तरुणांना कळल्या पाहिजेत.
आजच्या ‘कॉर्पोरेट जगता’चे नेतृत्व सुजाण तरुणांनी करावयाचे असेल, तर छत्रपतींच्या अनेक व्यूहनीतींचा साकल्याने विचार व अंगीकार करावा लागेल.
या पुस्तकात खालील मुद्द्यांचा साकल्याने विचार करण्यात आला आहे.
शिवरायांचे-
• नियोजन आणि व्यवस्थापन
• नेतृत्व आणि कार्यपद्धती
• अर्थशास्त्र आणि अर्थकारण
• दूरदृष्टिता आणि विचारसरणी
• आधुनिक धार्मिकता व कर्मयोग
• उत्तम चारित्र्याची कल्पना
शिवराय न की केवळ उत्तम नेता होते; तर ते एक उत्तम व्यवस्थापकदेखील होते. शिवरायांनी स्वराज्याची स्थापना हे आपले ‘जीवन – कर्तव्य’ मानले होते. उत्तम काही घडविण्यासाठी महत्त्वाकांक्षा, ध्येयपूर्तीसाठी धोका पत्करण्याची तयारी, सहकाऱ्यांना प्रेरणा, लोकांच्या अस्तित्त्वाला सर्वाधिक महत्त्व देणारे व रयतेच्या सुखातच आपले सुख मानणारे शिवरायांचे नेतेपण कालातीत आहे. ‘नि:स्पृहता’ व यशस्वी व्यवस्थापन यांची उत्तम सांगड शिवरायांच्या नेतृत्वात होती. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना शिस्तीचे काटेकोर धडे दिले होते; पण सोबतीला निर्णयप्रक्रियेतील योग्य असे स्वातंत्र्यही दिले होते.
‘नेतृत्वाच्या गाभ्याशी आत्मिक शक्तीचा वास असेल तर असे नेतृत्व खडतर वातावरणातही चमत्कार करू शकते. शिवरायांनी आपल्या प्रत्येक सैनिकाच्या आत्मिक शक्तीला आवाहन करीत जागृत केले होते. यास्तव प्रत्येक सैनिक पडेल त्या परिस्थितीत नेतृत्व करण्याची कुवत राखून होता. केवळ एक उत्तम नेताच असे नेतृत्व निर्माण करू शकतो, हे मात्र खरे!
शिवरायांची व्यूहनीती यशस्वी ठरली ती त्यांच्या व्यवस्थापकीय कौशल्यामुळे. आपल्या अजोड व्यवस्थापकीय कौशल्याच्या बळावर त्यांनी आपल्या शत्रूंना नामोहरम केले व स्वराज्याची घडी उत्तम बसविली. उत्तम व्यवस्थापनामध्ये प्रसंगनिष्ठ चतुराई, साहाय्यक संघ किती महत्त्वाची भूमिका बजावतो हे शिवरायांनी दाखवून दिले. शिवरायांच्या प्रत्येक चढाईची परिणामकारकता ही दीर्घकालीन असायची, ज्यामुळे त्यांना राज्यांतर्गत प्रशासकीय रचनेसाठी वेळ देता यायचा. ठरलेल्या उद्देशाची वा संकल्पाची वा योजनेची अचूक अंमलबजावणी केल्यामुळे शिवरायांना इच्छित ध्येय साध्य करता आले.
“आचरणाशिवाय विचार निरर्थक असतो आणि विचारांशिवाय आचरण धोकादायक असते.” छत्रपतींच्या एकूणच वाटचालीत विचार व आचरण या दोन्ही गोष्टींना समान महत्त्व होते. २१व्या शतकात फक्त उत्सव साजरे करण्यापेक्षा आम्ही शिवरायांची व्यूहनीती व व्यवस्थापकीय कौशल्य सामान्य जनांच्या हितासाठी वापरण्याचा निश्चय केला पाहिजे.
स्वातंत्र्य, समता, एकता आणि बंधुता या चतु:सूत्रीवर शिवरायांनी ‘कल्याणकारी राज्य’ उभे केले. स्वराज्याचा प्रदेश ‘कल्याणकारी राज्या’च्या संकल्पनेनुसार विकसित करून शिवरायांनी तमाम भारतीयांसाठी बरेच मापदंड घालून दिले. हे करीत असताना त्यांनी ‘समते’च्या तत्त्वावर आधारित विविध आराखड्यांद्वारे नवनवीन छोट्या प्रांतांना सामील केले अन् ‘बंधुते’ चे तत्त्व वापरीत आपल्या साथीदारांना ‘रयतेच्या कल्याणार्थ’ कार्यान्वित केले. कल्याणकारी राज्याच्या राजाची वा सामूहिक नेतृत्वाची जबाबदारी छत्रपतींनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली.
कल्याणकारी राज्याच्या केंद्रभागी रयत असते; परंतु ‘रयतेच्या कल्याणार्थ’ राजाची अर्थात राज्यकर्त्यांची कर्तव्ये जर सुस्पष्ट नसतील तर असे कल्याण कधी साधलेच जाणार नाही.
डॉ. गिरीश प. जाखोटिया
• ‘जाखोटिया अॅण्ड असोसिएट्स’, विलेपार्ले (पू.), मुंबई या व्यवस्थापकीय सल्लागार संस्थेचे संचालक. • ख्यातनाम व्यवस्थापकीय, वित्तीय व उद्योजकीय सल्लागार. • तब्बल ६० भारतीय व विदेशी कंपन्या आणि बँकांचे सल्लागार. • जमनालाल बजाज व्यवस्थापन शिक्षण संस्था, मुंबई विद्यापीठात १५ वर्षे प्राध्यापक म्हणून अनुभव. • भारतात व भारताबाहेर विविध विषयांवर २००० पेक्षा अधिक व्याख्याने. • पत्नीसह उद्योगजगतातील व्यवस्थापकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन. • सहा इंग्रजी व सहा मराठी पुस्तकांचे लेखक. • अनेक उद्योजकीय व वित्तीय संस्थांसाठी काम करताना नव्या कल्पना व रचनांचा वापर. • भारतीय व्यवस्थापनअर्थकारणाचा विस्तृत आढावा घेताना गेली ३० वर्षे ‘आध्यात्मिक अर्थशास्त्रा’चाही अभ्यास सुरू. सन्मान व पुरस्कार • सन १९९५ : ‘बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशन’तर्फे अखिल भारतीय व्यवस्थापन शिक्षणातील सर्वोत्तम प्राध्यापक सन्मान प्राप्त. • सन १९९६ : ‘अखिल भारतीय व्यवस्थापन – शिक्षणातील सर्वोत्तम प्राध्यापक’ हा सन्मान प्राप्त.
Publisher : Saket Prakashan Pvt. Ltd.; Fifth edition (1 January 2019); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language : Marathi
Paperback : 272 pages
ISBN-10 : 8177869647
ISBN-13 : 978-8177869644
Item Weight : 200 g
Dimensions : 20.8 x 13.8 x 1.5 cm
Country of Origin : India
Net Quantity : 1 Count
Packer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name : Book
Reviews
There are no reviews yet.