WhatsApp Edit Message Feature: आज बहुतेक लोकांच्या मोबाईलमध्ये कोणतं दुसरं अॅप असो ना असो मात्र व्हॉट्सअॅप नक्कीच पाहायला मिळेल. व्हॉट्सअॅप वापरताना अनेकदा एखाद्या व्यक्तीला आपण मेसेज पाठवत असताना त्यात टायपिंग एरर होतात. यामुळे अनेकदा चुकीचा मेसेजही समोरच्या व्यक्तीला जातो. तो जाऊ नये म्हणून बरेच लोक तो मेसेज डिलीट करतात. जर तुम्हालाही व्हॉट्सअॅपवर या समस्येचा सामना करावा लागला असेल तर लवकरच व्हॉट्सअॅप त्यावर उपाय आणणार आहे. व्हॉट्सअॅप एक खास फीचरवर काम करत आहे. हे फीचर आल्यानंतर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअॅप (WhatsApp) एखादा मेसेज चुकीच्या पद्धतीने सेंड झालं असेल, तर तुम्हाला तो डिलीट न करता एडिट करायचं ऑप्शन मिळणार आहे. या फीचरची बऱ्याच काळापासून युजर्स वाट पाहत आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…
WhatsApp Edit Message Feature: सर्वात आधी या युजर्सला मिळणार याचा लाभ
व्हॉट्सअॅपच्या डेव्हलपमेंटवर नजर ठेवणारी वेबसाइट Wabetainfo नुसार, WhatsApp एका नवीन फीचरवर काम करत आहे, जे iOS युजर्सला मेसेज एडिट करण्याचा पर्याय देईल. वेबसाइटने एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये आपण पाहू शकता की, एखादा मेसेज एडिट केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला WhatsApp कडून अलर्ट मेसेज पाठवला जात आहे. नवीन फीचर अंतर्गत तुम्ही फक्त 15 मिनिटांसाठी मेसेज एडिट करू शकाल. म्हणजेच तुम्ही मेसेज पाठवल्यापासून पुढील 15 मिनिटेच एडिट करू शकता.
असं असलं तरी नवीन फीचर अंतर्गत तुम्ही फक्त मेसेज एडिट करू शकाल मीडिया कॅप्शन नाही. म्हणजेच जर तुम्ही व्हिडीओ किंवा फोटोसह काहीतरी टाइप करून पाठवले असेल आणि ते चुकीचे असेल, तर तुम्ही ते पुन्हा यादीत करू शकणार नाही. सध्या हे फीचर काही iOS युजर्ससाठी डेव्हलप केले जात आहे, जे नंतर बीटा व्हर्जनमध्ये लॉन्च केले जाईल. नंतर येत्या काळात ते सर्वांसाठी लॉन्च केले जाईल. हे अँड्रॉइडसाठी कधी रिलीज होणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
इन्स्टा आणि एफबीमध्ये आता पैसे भरून मिळेल ब्लू टिक
व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटाने अलीकडेच त्यांच्या दोन प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम आणि फेसबुकसाठी ‘पेड व्हेरिफिकेशन’ सेवा जाहीर केली आहे. सध्या ही सेवा काही देशांमध्ये सुरू करण्यात आली आहे, जी आगामी काळात सर्व देशांमध्ये सुरु होणार आहे. यानंतर आता ट्विटरप्रमाणेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पैसे देऊन लोक सहज ब्लू टिक मिळवू शकतात.