iQOO Neo 7 5G: iQOO Neo 7 5G भारतात 16 फेब्रुवारी रोजी लॉन्च होऊ शकतो. कंपनीने गेल्या वर्षी चीनमध्ये iQOO Neo 7 SE लॉन्च केला आहे. आता IQ लवकरच या फोनचे रिब्रँडेड व्हर्जन भारतात लॉन्च करणार आहे. दरम्यान मोबाईल फोन लॉन्च होण्याआधी एका टिपस्टरने त्याची किंमत उघड केली आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनी खूप लेटेस्ट फीचर्स देणार आहेत. या फोन दिसायला ही स्मार्ट असून खासकरून तरुणांना हा आकर्षित करेल. याच स्मार्टफोनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…
iQOO Neo 7 5G: किती असू शकते किंमत?
टिपस्टर अभिषेक यादव याने ट्विटरद्वारे माहिती शेअर करत सांगितले आहे की, iQOO Neo 7 5G च्या 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची भारतात किंमत 26,999 रुपये असू शकते. तसेच याच्या टॉप मॉडेलची म्हणजेच 12/256GB व्हेरिएंटची किंमत सुमारे 30 किंवा 32,000 रुपये असू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, स्मार्टफोनची विक्री 19 किंवा 20 फेब्रुवारीपासून सुरू होईल. कंपनी तुम्हाला स्मार्टफोनवर काही बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देखील देऊ शकते. असं असलं तरी कंपनीने याच्या किंमतीबद्दल अधिक माहिती जाहीर केलेली नाही आहे.
iQOO Neo 7 5G: मोबाईलमध्ये मिळू शकतात ‘हे’ स्पेसिफिकेशन
iQOO Neo 7 5G मध्ये तुम्हाला फुल एचडी प्लस रिझोल्यूशनसह 6.7 इंच AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. जो 120hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 8200 चिपसेटवर काम करेल. तुम्हाला मोबाईल फोनमध्ये 5000 mAh बॅटरी मिळू शकते, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कॅमेराच्या बाबतीत, मोबाइल फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येईल. ज्यामध्ये तुम्हाला 64 मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल मायक्रो कॅमेरा मिळेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सलचा कॅमेरा फ्रंटमध्ये उपलब्ध असेल. iQOO Neo 7 5G मध्ये कंपनी तुम्हाला 2 प्रमुख Android अपडेट्स देईल. तसेच तुम्हाला 3 वर्षांसाठी सिक्युरिटी पॅच अपडेट्सचा सपोर्ट मिळेल.
Poco X5 pro ची विक्री आजपासून सुरू
Poco ने अलीकडेच Poco X5 pro 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची विक्री आजपासून सुरू झाली असून तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून तो खरेदी करू शकाल. मोबाईल फोनच्या 128GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे. यातच कंपनी तुम्हाला निवडक बँक कार्डांवर 2,000 रुपयांची सूट देत आहे.