Infinix Smart 7 : Infinix ने आपला नवीन स्मार्टफोन Infinix Smart 7 भारतात लॉन्च केला आहे. यात 6000mAh ची मोठी बॅटरी आहे. डिव्हाइसला एकच रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आले आहे. कंपनीने याला अनेक रंग पर्यायांसह लॉन्च केले आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने Infinix Smart 7 7,500 रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च केला आहे. चला जाणून घेऊया फोनची खरी किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स.
Infinix Smart 7 चे स्पेसिफिकेशन्स
- डिस्प्ले: 6.6-इंचाचा HD+ IPS डिस्प्ले
- बॅटरी: 6000mAh बॅटरी
- रॅम: 4GB रॅम
- रीफ्रेश दर: 120Hz
- मागील कॅमेरा: 13MP प्रायमरी कॅमेरा
- सेल्फी कॅमेरा: 5MP
- कनेक्टिव्हिटी: ड्युअल सिम स्लॉट, यूएसबी-टाइप सी पोर्ट, ड्युअल 4G VoLTE, ब्लूटूथ 4.2
Infinix Smart 7 मध्ये 6.6-इंचाचा HD + IPS डिस्प्ले आहे ज्याचा पिक्सेल रिझोल्यूशन 1612 x 720 आणि पीक ब्राइटनेस 500 nits आहे. फोनमध्ये Unisoc Spreadtrum SC9863A प्रोसेसर देण्यात आला आहे. खास गोष्ट म्हणजे फोनमध्ये तुम्हाला 4GB रॅम सह 64GB स्टोरेज मिळेल, ज्याला मायक्रो SD कार्डच्या मदतीने 2TB पर्यंत वाढवता येऊ शकते. डिव्हाइसची रॅम देखील 3GB पर्यंत वाढवता येते. हा फोन Android 12 वर आधारित XOS 12 वर चालतो.
Infinix Smart 7 किंमत
हा Infinix स्मार्टफोन भारतात 7,299 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. फोनची विक्री अद्याप सुरू झालेली नाही. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता फोनची विक्री सुरू होईल. फोनमध्ये तुम्हाला 4GB रॅम सह 64GB अंतर्गत स्टोरेज मिळत आहे. हा हँडसेट Azure Blue, Emerald Green आणि Night Black या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
Lava Yuva 2 Pro लॉन्च
Lava ने आपला एंट्री-लेव्हल फोन Yuva 2 Pro भारतात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G37, 13MP AI ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 5,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन भारतात फक्त एकाच स्टोरेज प्रकारात लॉन्च करण्यात आला आहे. फोनच्या 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 7,999 रुपये आहे.
Poco C55 लॉन्च
Poco ने आज आपला नवीन फोन ‘Poco C55’ बाजारात लॉन्च केला आहे. कंपनीने 2 स्टोरेज पर्याय 4/64GB आणि 6/128GB मध्ये Poco C55 सादर केला आहे. Poco च्या 4/64GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,499 रुपये आहे. तर 6/128GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. कंपनी ग्राहकांना या फोनवर1,000 रुपयांची सूट देत आहे. यानंतर फोनची किंमत अनुक्रमे 8,499 रुपये आणि 9,999 रुपये होईल. ग्राहकांना 500 रुपयांची सवलत आणि विविध बँकांच्या कार्डांवर 500 रुपयांची सूट दिली जात आहे.