Price Action Trading : Share Market Books in Marathi Indian Stock Option Technical Analysis & Investing, Learning Guide Zone Bazar Book : द शेअर मार्केट, Sharemarket on Intraday with trends charts इंट्राडे ट्रेडिंग, मराठी पुस्तक, प्राइस एक्शन बुक, बाजार इन झोन Bazaar, Bajar

165.00

Category:

Description

Price: ₹165.00
(as of Feb 23,2023 13:00:24 UTC – Details)



From the Publisher

प्राइस ॲक्शन ट्रेडिंग

Share Market BookShare Market Book

तुम्ही ट्रेडिंगव्हयुमध्ये कधी कॅन्डलस्टिक चार्ट घेऊन :

मूव्हिंग अॅव्हरेज (MA), बोलिंजर बॅन्ड (BB) आणि PSAR हे सगळे इंडिकेटर्स काढून टाकले आहेत का ?

RSI स्टॉकॅस्टिक्स, MACD, ADX हे सगळे सुप्त इंडिकेटर्स काढून टाकले आहेत का ?

विचार करा की, तुम्हाला अशा पद्धतीनं ट्रेड करता येईल का ?

हे अशक्य आहे असं तुम्हाला वाटेल; पण एक विसरू नका की, जवळपास सगळ्या इंडिकेटर्सचं अस्तित्व एकाच घटकावर अवलंबून असतं- ‘प्राइस.’ प्राइसमध्ये चढ-उतार झाला, तर या इंडिकेटर्समध्येही चढ-उतार होईल, बरोबर ? मग कशाचा अभ्यास करणं इष्ट होईल ? प्राइसचा का इंडिकेटर्सचा ? तुम्हीच विचार करू शकता.

प्राइस ॲक्शन ट्रेडिंग म्हणजे काय ?

प्राइस ॲक्शन ट्रेडिंगचं एक तंत्र आहे. यामध्ये टेक्निकल इंडिकेटर्स किंवा इतर घटकांकडे लक्ष न देता, ट्रेडर शेअर बाजाराचा अंदाज घेतो आणि प्राइस, म्हणजेच किंमतीच्या चढ-उतारांच्या आधारावर त्याचे वैयक्तिक ट्रेडिंगविषयक निर्णय घेतो.

Share Market BookShare Market Book

प्राइस अ‍ॅक्शन म्हणजे काय?

‘प्राइस अ‍ॅक्शन’ म्हणजे एका शेअर बाजारात स्टॉक किंवा इंडेक्स यांच्या किमतीमध्ये होणारे चढ-उतार. कोणत्याही शेअर बाजाराच्या दिवशी, शेअर बाजार सुरू झाल्यापासून बंद होईपर्यंत किंमत बदलत राहते. हा बदल म्हणजे प्राइस अ‍ॅक्शन.

प्राइस अ‍ॅक्शन ट्रेडिंग म्हणजे काय?

प्राइस अ‍ॅक्शन ट्रेडिंग ही एक अशी संकल्पना आहे, ज्यात ट्रेडर चार्ट वाचतो, आणि टेक्निकल सूचनाफलक किंवा अन्य कोणत्याही घटकांवर अवलंबून न राहता, किमतीमध्ये होणार्‍या बदलांवर आधारित ट्रेडिंगविषयी काही निर्णय घेतो.

साध्या शब्दांत, ट्रेडिंगविषयी निर्णय घेताना ट्रेडर फक्त ‘प्राइस’ आणि ‘व्हॉल्युम’ यांचाच विचार करतो.

ट्रेडिंगचे तीन मुख्य घटक (याच क्रमानुसार) असे आहेत :

1. किंमत – त्यातूनच उपलब्ध संधी समजतात.

2. वेळ – त्यातून उपलब्ध संधींचं नियमन होतं.

3. व्हॉल्युम – ज्या संधी उपलब्ध होत्या, त्यापैकी किती यशस्वी झाल्या आणि किती अयशस्वी हे मोजण्याचं मापक.

व्हॉल्युम हा आवश्यक घटक आहे, कारण बाजारातल्या 20 टक्के मोठ्या सौदेबाजांकडूनच जवळपास 80 टक्के ट्रेडिंग व्हॉल्युम निर्माण होतो.

त्यामुळे, पोझिशनल ट्रेडिंग, BTST ट्रेडिंग आणि दीर्घकालीन ट्रेडिंग यात यशस्वी सौदे करण्यासाठी तुमच्याकडे ‘प्राइस’ आणि‘व्हॉल्युम’ची माहिती असली तरी ती पुरेशी असते.

एखाद्याला स्काल्पिंग किंवा इन्ट्राडे ट्रेडिंग करायचं असेल, तर त्याला ‘वेळ’ या घटकाशी मैत्री करावी लागेल. प्रकरण पाचमध्ये मी त्याविषयी तपशिलात लिहिलेलं आहे.

Share Market BookShare Market Book

स्विंग ट्रेडिंग (Swing Trading)

जेव्हा किंमत एकदा वर, एकदा खाली अशा पद्धतीनं झोके घेत असते, म्हणजेच ‘स्विंग’ होत असते तेव्हा तिला‘साइडवेज झोन’ (Sideways Zone) असं म्हणतात. जेव्हा किंमत अशी साईडवेज जाते तेव्हा त्या झोक्याचा संपूर्ण फायदा घेण्याचं तंत्र म्हणजे स्विंग ट्रेडिंग. विरुद्ध बाजूनं दबाव वाढायच्या आधीच सौद्यातून बाहेर पडणं ही त्या मागची मुख्य कल्पना आहे. म्हणजेच, शेअर बाजार विरुद्ध दिशेनं जाण्याआधीच तुम्ही फायदा करून घेता. पहिली पायरी म्हणजे एखादा स्टॉक अथवा इंडेक्स निवडा.

दीर्घकालीन सौद्यासाठी (long trade) बुलिश एन्गल्फिंग, बुलिश हारामी, हॅमर, मॉर्निंग स्टार असे कॅण्डलस्टिक पॅटर्न्स दिसतात का त्याचा शोध घ्या. किमतीची खात्री पटली आणि ती पक्की झाली की, तक्त्यामध्ये जी सर्वाधिक किंमत दिसत आहे त्याच्याही वरच्या किमतीचा सौदा घ्या आणि तक्त्यामध्ये जी सर्वांत कमी किंमत दिसत आहे, त्याच्या खालच्या किमतीवर तुमचा स्टॉप-लॉस लावा.

पुढची रेझिस्टन्स लाइन दिसायला लागली की, सौदा पूर्ण करा. जोखीम : फायदा हे प्रमाण 1:2 असेल तरच असा सौदा करा. ट्रेंड फॉलोइंग या पद्धतीत‘ट्रेंड’ला महत्त्व असतं, कारण ट्रेंड ज्या दिशेनं असतो त्याच दिशेनं सगळे सौदे होतात.

दीर्घकालीन, म्हणजे लाँग ट्रेडकरिता आधीचा किंवा चालू ट्रेंड हा वरच्या दिशेनं असायला हवा. किंमत जर खाली आली (correction) आणि चांगला कॅण्डलस्टिक पॅटर्न दिसला, तर लाँग ट्रेडचं नियोजन करू शकता.

अल्पकालीन, म्हणजे शॉर्ट ट्रेडकरिता आधीचा किंवा चालू ट्रेंड हा खालच्या दिशेनं असायला हवा. किंमत जर वर चढायला लागली (bounce) आणि चांगला कॅण्डलस्टिक पॅटर्न दिसला, तर शॉर्ट ट्रेडचं नियोजन करू शकता.

ब्रेकआउट ट्रेडिंग

जेव्हा एखाद्या स्टॉकची किंमत एका ठराविक रेझिस्टन्स लाइनच्या बाहेर जाते आणि त्याचे जास्त प्रमाणात सौदेही होतात, तेव्हा ब्रेकआउट ट्रेडसाठी संधी असते. किमतीनं रेझिस्टन्सची पातळी मोडली की ब्रेकआउट ट्रेडर लाँग पोझिशन घेतो; त्याचा स्टॉप लॉस रेझिस्टन्स पातळीच्या खाली असतो. या पद्धतीत ट्रेडर त्याच्या स्टॉप लॉसवर लक्ष ठेवून असतो किंवा किमतीच्या चढलेल्या पातळीवर बाहेर पडून स्वत:चा मोठा फायदा करून घेता.

Share Market BookShare Market Book

बहुतांश ट्रेडर्स ‘तांत्रिक विश्लेषणा’ला खूप महत्त्व देतात आणि इतर संकल्पनांकडे दुर्लक्ष करतात. कृपया अशी चूक करू नका.

यशस्वी ट्रेडिंगचे चार स्तंभ असतात :

1. तांत्रिक विश्लेषण

2. पैशांचं व्यवस्थापन

3. मानसशास्त्र

4. अंमलबजावणी

हे चार स्तंभ म्हणजे एका गाडीच्या चार चाकांसारखे आहेत. त्यापैकी एक जरी चाक नसेल, तर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये यश मिळू शकणार नाही. त्यामुळे ट्रेडिंगमध्ये यश मिळवायचं असेल तर सगळ्या संकल्पनांना एकसमान महत्त्व द्या.

विविध पद्धतीनं उपलब्ध असलेल्या जुन्या माहितीचं विश्लेषण करून एखाद्या स्टॉक/ इंडेक्सची भविष्यातली दिशा काय असेल याचं भाकीत करण्यासाठी तांत्रिक विश्लेषण केलं जातं.

तंत्रशुद्ध ट्रेडर्सचा असा विश्वास असतो की, भविष्यातली प्राइसची दिशा ठरवण्यासाठी सध्याची आणि भूतकाळातील प्राइस अ‍ॅक्शन माहीत असणं अतिशय महत्त्वाचं असतं. सौद्यासंबंधी निर्णय घेताना ते आणखी कोणत्याही मूळ माहितीचा वापर करत नाहीत.

काही नियम असतात ज्यातून पैशांचं व्यवस्थापन होऊ शकतं. ट्रेडिंगमधून चांगला परतावा मिळावा आणि जोखीम कमीत कमी राहावी, याकरिता पोझिशन घेण्यासाठी काही पैसे राखीव ठेवावे लागतात. यासाठी काही नियम आवश्यक असतात.

एखादी परिस्थिती अथवा प्रसंग यात असलेली मानसिक स्थिती किंवा भावना म्हणजे सायकॉलॉजी. त्यामुळे आपण जेव्हा ट्रेडिंगची सायकॉलॉजी म्हणतो तेव्हा ट्रेडिंगसंबंधी आकलन करणारे घटक आपल्याला अपेक्षित असतात.

हाव, भीती, पश्चात्ताप आणि आशा या चार भावना ट्रेडिंगशी निगडित आहेत. एक लक्षात घ्या, ज्ञानाच्या अभावामुळे या चार भावना निर्माण होतात. अंमलबजावणी ही ट्रेडिंगची नस आहे.

तुमच्याकडे उत्तम निकाल देणारी पद्धत आणि पैशांच्या नियोजनाचे व व्यवस्थापनाचे नियम काटेकोर असायला हवेत. शेअर बाजारातली परिस्थिती कशीही असली, तरीही तुमच्या ठरवलेल्या योजनांची अंमलबजावणी करून तुम्ही ट्रेडिंगमधून दीर्घकालीन पैसा कमावू शकता.

Intraday TradingIntraday Trading

इंद्रजिथ शांथराज

इंद्रजिथ शांथराज हे पूर्णवेळ ट्रेडर, सर्वाधिक खप असणार्‍या पुस्तकांचे लेखक आणि 10 वर्षांचा अनुभव असलेले माजी आयटी प्रोफेशनल आहेत. ते स्टॉक मार्केटमध्ये पूर्णवेळ करिअर करत आहेत, कारण तो त्यांच्या आवडीचा आणि कौशल्याचा विषय आहे.

शेअर ट्रेडिंगमध्ये यश मिळवल्यानंतर बहुतेकांना या कठीण वाटणार्‍या विषयात यशाचा मार्ग दाखवण्याची त्यांची इच्छा आहे. ट्रेडिंगव्यतिरिक्त प्रवास करणे, वाचन आणि आध्यात्मिक साधना हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. त्यांचे लेख www.profiletraders.in या वेबसाइटवर वाचता येऊ शकतात.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; First edition (1 January 2023); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 144 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352203712
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352203710
Item Weight ‏ : ‎ 140 g
Dimensions ‏ : ‎ 20.8 x 13.8 x 0.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Price Action Trading : Share Market Books in Marathi Indian Stock Option Technical Analysis & Investing, Learning Guide Zone Bazar Book : द शेअर मार्केट, Sharemarket on Intraday with trends charts इंट्राडे ट्रेडिंग, मराठी पुस्तक, प्राइस एक्शन बुक, बाजार इन झोन Bazaar, Bajar”

Your email address will not be published. Required fields are marked *